‘द ऑफेंडर’ हा चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 09:37 AM2018-06-18T09:37:25+5:302018-06-18T15:07:25+5:30

घटना-प्रसंगांतून निर्माण केलेले गूढ उकलताना केली जाणारी रहस्य आणि त्याची कल्पक मांडणी यांच्या आकर्षणातूनच रहस्यपटांची निर्मिती होत असते. भीती, ...

'The Offender' will be screened on this day | ‘द ऑफेंडर’ हा चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित

‘द ऑफेंडर’ हा चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित

googlenewsNext
ना-प्रसंगांतून निर्माण केलेले गूढ उकलताना केली जाणारी रहस्य आणि त्याची कल्पक मांडणी यांच्या आकर्षणातूनच रहस्यपटांची निर्मिती होत असते. भीती, प्रेम, विश्वास यांचा संमिश्र अनुभव देणारा ‘द गोल्ड पिरॅमिड पिक्चर्स निर्मित’ ‘द ऑफेंडर’ हा असाच एक मराठी थरारपट २२ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट क्षेत्राची कसलीही पार्श्वभूमी नसलेल्या अर्जुन महाजन, डॉ. अमित (श्रीराम) कांबळे, दिनेश, अनिकेत, सोमनाथ, सुरज आणि शिवाजी या सात मित्रांनी एकत्र येत या चित्रपटाचे शिवधनुष्य पेलले आहे.
‘द ऑफेंडर’ – स्टोरी ऑफ अ क्रिमिनल’ या चित्रपटाची निर्मिती एस्. एम्. महाजन आणि व्ही. आर. कांबळे यांनी केली असून संकलन, दिग्दर्शन अर्जुन महाजन यांचे आहे. तिघांच्या आयुष्यात घडणाऱ्या अकल्पित घटनांवर या चित्रपटाचे कथानक फिरते. ‘द ऑफेंडर’ या सिनेमाच्या निमित्ताने अर्जुन महाजन, डॉ. अमित (श्रीराम) कांबळे, दिप्ती इनामदार हे तीन नवे चेहरे प्रथमच मराठी रुपेरी पडद्यावर झळकत आहेत. नात्यातली गुंतागुंत दाखवतानाच घडणाऱ्या काही घटनांमुळे पती पत्नीच्या नात्याचे रंग कसे बदलतात याचे चित्रण ‘द ऑफेंडर’ चित्रपटात करण्यात आले आहे. मानवी नातेसंबंधांमधील चढाओढ त्यातून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे त्यांचे खेळ असा हा चित्रपट आहे.
या चित्रपटात अर्जुन महाजन, डॉ. अमित(श्रीराम) कांबळे, दिप्ती इनामदार यांच्यासह दिनेश पवार पाटील, अनिकेत सोनवणे, सुरज दहिरे, शिवाजी कापसे, सोमनाथ जगताप आणि लव्हनिस्ट हे कलाकार आहेत. मराठी चित्रपटांमध्ये अभावाने आढळणाऱ्या क्लायमॅक्स-अँटीक्लायमॅक्स, पॅरॅलल एडीट वगैरे पद्धती या चित्रपटात आत्मविश्वासाने हाताळल्या आहेत. चार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये ‘द ऑफेंडर’ गौरविला गेला आहे.
‘द ऑफेंडर’ चित्रपटात दोन वेगवेगळ्या जॉनरची गाणी आहेत. ‘अशी तू माझी होशील का’ हे रोमँटीक गीत स्वप्नील भानुशालीने गायले आहे तर आरोह वेलणकरने ‘घे भरारी’ हे गीत गायले आहे. या सुमधुर गीतांना आरोह, कृष्णा सुजीत यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटाचे संकलन-दिग्दर्शन आणि गीते अर्जुन महाजनची तर सहाय्यक दिग्दर्शन सोमनाथ जगतापचे आहे. चित्रपटाची कथा डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांची असून पटकथा आणि संवाद अर्जुन महाजन, डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांनी लिहिले आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी अनिकेत सोनवणे, डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांनी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन सुरज दहिरे यांचे ध्वनीमुद्रण दिनेश पवार यांचे असून निर्मिती व्यवस्थापन शिवाजी कापसेने केलं आहे.

Web Title: 'The Offender' will be screened on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.