​अरे बापरे ! सुबोध भावे मनोरुग्ण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2016 04:38 PM2016-05-06T16:38:06+5:302016-05-06T22:08:06+5:30

ऐकुण दचकलनात ना? सिनेसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे मनोरुग्ण झाला असे. आता तर चांगला होता. मग असे कसे झाले. ...

Oh dear! Subodh Bhave Manorcun? | ​अरे बापरे ! सुबोध भावे मनोरुग्ण?

​अरे बापरे ! सुबोध भावे मनोरुग्ण?

googlenewsNext
ुण दचकलनात ना? सिनेसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे मनोरुग्ण झाला असे. आता तर चांगला होता. मग असे कसे झाले. अहो पण घाबरायचे काहीच कारण नाही. सुबोध भावे मनोरुग्ण वगैरे झालेला नाही तर एका आगामी चित्रपटात तो मनोरुग्णाची भूमिका साकारतोय. ‘खेळ ’ हे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. मराठी सिनेसृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेता अशी सुबोध भावेची ओळख आहे. बाळगंधर्व आणि कट्यार काळजात घुसली यासारख्या दर्जेदार चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय व दिग्दर्शनाची छाप सोडली आहे. 

सामाजिक सिनेमांना मी कंटाळलो आहे, सध्या काहीतरी आव्हानात्मक करण्याकडे माझा कल आहे, असे सुबोधचे म्हणणे आहे. म्हणून मी मनोरुग्णाची वेगळी भूमिका साकारतोय, ही एक दुहेरी व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्तिरेखा आहे. आता अभिनेता सुबोधला मनोरुग्णाच्या भूमिकेत पाहायला सर्वच उत्सुक आहेत. 

Web Title: Oh dear! Subodh Bhave Manorcun?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.