आया जमाना वेब सिरीज का

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2016 12:18 PM2016-09-23T12:18:30+5:302016-09-27T10:34:17+5:30

 बेनझीर जमादार मराठी इंडस्ट्रीमध्ये वेबसीरीजची धूम पाहायला मिळतेय. चित्रपट, लघुपट आणि मालिकानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेब सिरीजची चलती असल्याचे ...

Of the old age web series | आया जमाना वेब सिरीज का

आया जमाना वेब सिरीज का

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">
 बेनझीर जमादार

मराठी इंडस्ट्रीमध्ये वेबसीरीजची धूम पाहायला मिळतेय. चित्रपट, लघुपट आणि मालिकानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेब सिरीजची चलती असल्याचे पाहयाला मिळतंय. चित्रपटाप्रमाणेच या वेब शोची चर्चा ही सध्य़ा रंगताना दिसते आहे. 'कास्टिंग काऊच विथ अमेय आणि निपुण', 'स्ट्रगलर साला',  एका पेक्षा एक वेब मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या मालिकांना चांगला प्रतिसाददेखील मिळतोय.यानतंर आता आपल्या 'बापाचा रस्ता' ही वेबसीरीज देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने घेतलेला मराठी वेबसिरीजाचा हा आढावा. 


'कास्टिंग काऊच विथ अमेय आणि निपुण' : निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ यांच्या 'कास्टिंग काऊच' या वेबसिरीजने प्रेक्षकांमध्ये चांगली धूम उडवली आहे. तसेच या वेब सिरीजला मिळणारा प्रतिसाद पाहता या वेबसिरीजमध्ये मराठी कलाकार आवर्जुन हजेरी लावताना दिसता आहेत. या वेब सिरीजमध्ये रिमा, महेश मांजरेकर या दिग्गजकलाकारही सहभागी झाल्याचे पाहयला मिळाले. तसेच सई ताम्हणकर, प्रिया बापट, रिंकु राजगुरू, श्रेया पिळगांवकर या कलाकारांनी येऊन देखील धमाल केली आहे. 


 
स्ट्रगलर साला: विजू माने दिग्दर्शित 'स्ट्रगलर साला' ही वेब सिरीज आहे. या वेब सिरीजमध्ये अभिनेता संतोष जुवेकर आणि कुशल बद्रिके आहेत. या वेब सिरीजच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत स्ट्रगल करून आपली जागा निर्माण करणाऱ्या कलाकारांचे विश्व दाखविण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही वेब मालिकाला आपल्या जवळची वाटते आहे. 


बॅक बेंचर्स : शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो.  शेवटचा बाक हा तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. 'बॅक बेंचर्स' या वेब सिरीजमध्य़े शेवटच्या बाकावर बसणारे मराठी कलाकार आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. शाळेत असताना मागच्या बाकावर बसून केलेली धमाल मस्ती किस्से हे कलाकार सांगत आहे. आतापर्यंत किशोरी अंबिये, तेजश्री प्रधान यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला आहे.



आपल्या बापाचा रस्ता : 'कास्टिंग काऊच विथ अमेय आणि निपुण', 'स्ट्रगलर साला',  यासारख्या वेब सिरीजला मिळालेल्या यशानंतर 'आपल्या बापाचा रस्ता' ही नवी वेब सिरीज आपल्या भेटीला येणार आहे. ही वेब सिरीज प्रेक्षकांचा लाडका आशु म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर आणि नचिकेत पूर्णपात्रे घेऊन येत आहेत. चित्रपटानंतर लघुपटाला लोकांनी पसंती दिली तशीच आता टीव्ही मालिकांनतर इंटरनेटच्या जमान्यात प्रेक्षक वेब सिरीजला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळेच वेब सिरीजच्या वाढत्या पसंती मुळे वेब सिरीजकडे अनेक दिग्दर्शकही वळतातेयत. 

Web Title: Of the old age web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.