ओम फट स्वाहा...! 'झपाटलेला' सिनेमातल्या 'तात्या विंचू'च्या नावामागची इंटरेस्टिंग स्टोरी माहित्येय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 07:00 AM2023-07-28T07:00:00+5:302023-07-28T07:00:00+5:30
Zapatlela : नव्वदच्या दशकात महेश कोठारे यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले होते. महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला चित्रपट चांगलाच गाजला होता.
नव्वदच्या दशकात महेश कोठारे (Mahesh Kothare) यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले होते. महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला (Zapatlela) चित्रपट चांगलाच गाजला होता. इतकेच नाही तर या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. या चित्रपटातील लक्ष्या, महेश, तात्या विंचू, बाबा चमत्कार या पात्रांसोबतच कुबड्या खविस ही भूमिका देखील चांगलेच लोकप्रिय झाले होते. तुम्हाला तात्या विंचूच्या नावामागची इंटरेस्टिंग स्टोरी माहिती आहे का? खुद्द महेश कोठारेंनी याबद्दल सांगितले आहे.
झपाटलेला बनवताना महेश कोठारेंना त्यांच्या चित्रपटतील खलनायकाचे नाव जरा हटके हवे होते. त्यादरम्यान त्यांना खूप आधी पाहिलेला एक चित्रपट आठवला. त्या चित्रपटचे नाव रेड स्कॉर्पिअन असं होतं. रेड स्कॉर्पिअन या नावाचा अर्थ लाल विंचू असा होतो. तेव्हा महेश यांनी लाल विंचू या शब्दातील विंचू हा शब्द घेतला आणि त्यांच्या मेकअप मॅनचे नाव तात्या असे असल्यामुळे तात्या हे नाव घेऊन ‘तात्याविंचू’ हा शब्द निर्माण केला. सहा महिन्यांपूर्वी महेश कोठारे यांनी स्वतःचं ‘डॅम इट आणि बरंच काही’ या नावाचं पुस्तक प्रकाशित केले. त्यात त्यांनी बरेच अनुभव आणि किस्से यात शेअर केले आहेत.
झपाटलेला या चित्रपटातून फक्त लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांनाच नाही तर चित्रपटातील सर्वच कलाकारांना खूप प्रसिद्धी मिळाली. बऱ्याच जणांना माहित नसेल की, झपाटलेला हा चित्रपट एका हॉलिवूड चित्रपटाची अगदी हुबेहूब कॉपी आहे. झपाटलेला हा चित्रपट ‘चाइल्डस प्ले’ या चित्रपटाची कॉपी आहे. हा चित्रपट १९८८ साली रिलीज झाला होता आणि याचे एकूण ३ पार्ट बनवण्यात आले होते. या चित्रपटाची प्रसिद्धी पाहून दिग्दर्शक महेश कोठारे यांनी १९९३ साली झपाटलेला चित्रपट काढून एक धाडसी पाऊल उचलले. हा चित्रपट पुढे हिंदी भाषेतही बनवला गेला.