सचिन कुंडलकर यांनी शेअर केल्या ओम पुरी यांच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2017 01:02 PM2017-01-08T13:02:06+5:302017-01-08T13:02:06+5:30

बॉलिवुडचा तगडा कलाकार ओम पुरी हे काही दिवसांपूर्वीच काळाच्या पडदयाआड गेले आहेत. मात्र त्यांच्या काही आठवणी कायम स्मरणात राहतील. ...

Om Puri remembered by Sachin Kundalkar | सचिन कुंडलकर यांनी शेअर केल्या ओम पुरी यांच्या आठवणी

सचिन कुंडलकर यांनी शेअर केल्या ओम पुरी यांच्या आठवणी

googlenewsNext
लिवुडचा तगडा कलाकार ओम पुरी हे काही दिवसांपूर्वीच काळाच्या पडदयाआड गेले आहेत. मात्र त्यांच्या काही आठवणी कायम स्मरणात राहतील. अशाच या लाडक्या कलाकारांच्या काही प्रत्येक व्यक्ती आणि कलाकाराने सोशलमीडियावर शेअर केल्या आहेत. सामान्य व्यक्तीनेदेखील त्यांच्यासोबतचा गर्दीत खेचलेलला एखादा फोटो त्यांची आठवण म्हणून सोशलमीडियावर शेअर केला आहे. तर बॉलिवुड असो या मराठी कलाकार प्रत्येकाने त्यांना सोशलमीडियावर श्रध्दांजली वाहिली आहे. त्याचबरोबर सेटवरच्या काही गंमतीजंमतीदेखील त्यांनी सोशलमीडियावर शेअर केल्या आहेत. असाच सेटवरचा ओम पूरी यांच्यासोबत घालवलेला तो वेळेचा एक किस्सा मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी सोशलमीडियावर शेअर केले आहे. नुकतीच त्यांनी एक पोस्ट केली आहे. ते आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगतात, १९९५ . मी सेटवर असिस्टंट म्हणून कामाला होतो . ओम पुरी सेट वर आले . ते डॉक्टरची भूमिका करीत होते . त्यांचा स्टेस्थोसस्कोप आणि बॅग घेऊन मी उभा होतो. जवळजवळ थरथर कापत होतो. दिग्गज माणसांना भेटण्याआधी व्हायला होते तसा मी तसा नव्हर्स असणार. ते सेटवर आले आणि मी त्यांना त्यांच्या वस्तू हातात दिल्या. त्यांनी माझे नाव विचारले. मी सांगितले. ते म्हणाले एवढा नव्हर्स का आहे . मी उगाच कसाबसा हसत बसलो. मग ते वळून नीना कुलकर्णी ला म्हणाले चलो इस बेचारे कि थोडी खिचते है , असे म्हणून ते मला म्हणाले, ''मुझे स्टेस्थोसस्कोप का स्पेलिंग बताओ. जल्दी.'' मी घाबरून तिथून पळूनच गेलो. आणि मग पुढचा पूर्ण आठवडा ते भेटले कि मला स्पेलिंग विचारत. आणि मी हसत बसे. असो, मात्र ओम पुरी यांनी घेतलेली सचिन यांची खिचाई मात्र त्यांना कायम एक आठवण म्हणून स्मरणात राहील. सचिन यांचा वजनदार हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. त्यांच्या या चित्रपटाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील घेण्यात आले आहे. त्यांनी हॅपी जर्नी, गंध, राजवाडे अ‍ॅण्ड सन्स हे चित्रपटदेखील मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. 

Web Title: Om Puri remembered by Sachin Kundalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.