​OMG : हलाखीच्या परिस्थितीमुळे ‘या’ अभिनेत्याने मुंबईतील आमदार निवासात काढले दिवस !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2017 12:35 PM2017-06-22T12:35:08+5:302017-06-22T18:05:08+5:30

सिनेसृष्टीत असे बरेच अभिनेते आहेत ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत स्वत:ची ओळख निर्माण केली आणि सुपरस्टार झालेत. त्यापैकीच ...

OMG: Due to the circumstances of the incident, the actor took the residence of the MLA in Mumbai! | ​OMG : हलाखीच्या परिस्थितीमुळे ‘या’ अभिनेत्याने मुंबईतील आमदार निवासात काढले दिवस !

​OMG : हलाखीच्या परिस्थितीमुळे ‘या’ अभिनेत्याने मुंबईतील आमदार निवासात काढले दिवस !

googlenewsNext
नेसृष्टीत असे बरेच अभिनेते आहेत ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत स्वत:ची ओळख निर्माण केली आणि सुपरस्टार झालेत. त्यापैकीच एक मराठी अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे. 'मक्या' या नावाने प्रसिद्ध असलेला हा अभिनेता मराठवाडा आणि तेथील भाषेचा ठसा उमटवणारा खऱ्या अर्थाने मराठवाड्याचा हीरो आहे. कायद्याच बोला, गाढवाचं लग्न, दे धक्का, उलाढाल, जबरदस्त, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा अशा अनेक चित्रपटातून मकरंदने आपल्या खास संवाद शैलीने मराठी चित्रपटसृष्टीत ठसा उमटविला आहे. 

Related image

मकरंद अनासपुरे यांचा जन्म २२ जुलै १९७३ रोजी बीड(औरंगाबाद) येथे झाला. मात्र बऱ्याच ठिकाणी त्यांची जन्म तारीख २२ जून असल्याचे आढळते. मकरंदने औरंगाबाद येथून नाट्यशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्याने तिथे ४०० ते ५०० पथनाट्य केले. मकरंद हा ११ वर्षाचा असताना नाना पाटेकरचा ‘अंकुश’ हा चित्रपट त्याने तब्बल ११ वेळेस पाहिला. पुढील भवितव्यासाठी नाना पाटेकराने मकरंदला मुंबईत यायला सुचविले होते. नानांच्या सांगण्यावरुन मकरंद घरातून फक्त पाचशे रुपये घेऊ न मुंबईत आला पण हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याला बरेच दिवस आमदार निवासात राहावे लागले होते. 

Related image

चित्रपटात काम मिळण्यासाठी सुरुवातीला नाना पाटेकरांनी मकरंदला मदत केली होती. ‘यशवंत’ हा पहिला चित्रपट त्याला नानांमुळेच मिळाला होता. विशेष म्हणजे मकरंद या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शकसुद्धा होते. त्याचे काम पाहून ‘सरकारनामा’हा पहिला मराठी चित्रपट मिळाला. मकरंदने आपल्या करिअरमध्ये विविध भूमिका बजावल्या आहेत. शिवाय ‘डॅँबिस’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले तसेच ‘गोष्ट छोटी डोंगरा एवढी’ आणि ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटांची निर्मातीदेखील केली. 

Also Read : मकरंद अनासपुरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आता 'नाम' संस्थेद्वारे शेतकऱ्यांना मदतीचा हात देत आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी नाना पाटेकर यांच्या साथीने 'नाम' संस्था सुरु केली आहे. या संस्थेअंतर्गत शेतकर्यांना आर्थिक मदत करण्याबरोबरच एक कोटी झाडे लावणे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, कृषी केंद्रे, रोजगार केंद्रे असे विविध उपक्रम ही संस्था राबवतेय.   

Web Title: OMG: Due to the circumstances of the incident, the actor took the residence of the MLA in Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.