OMG! गेला उडतचा टीझर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2017 10:36 AM2017-02-26T10:36:29+5:302017-02-26T16:06:29+5:30
गेला उडत या नाटकाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टिझर नुकताच अभिनेता सिध्दार्थ जाधव याने सोशलमीडियावर प्रदर्शित केला आहे.
ेदार शिंदे दिग्दर्शित गेला उडत हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या नाटकाची पहिल्या दिवसांपासून चर्चा होत असल्याची पाहायला मिळत आहे. आता या नाटकाची पसंती पाहता, गेला उडत या नाटकाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टिझर नुकताच अभिनेता सिध्दार्थ जाधव याने सोशलमीडियावर प्रदर्शित केला आहे. त्यांच्या या टीझरला सोशलमीडियावर प्रचंड प्रमाणात लाइक्स मिळत आहेत. त्याचबरोबर एक नंबर, झक्कास म्हणत या नाटकाचे कौतुकदेखील करण्यात आले आहे.
बेला शिंदे यांच्या थर्डबेल प्रॉडक्शन्स व प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने या नाटकाची निर्मिती आहे. या नाटकाच्या माध्यमातून अभिनेता सिद्धार्थ जाधव हा बºयाच काळानं रंगभूमीवर परतला आहे. त्याच्या नेहमीच्या शैलीतला निखळ विनोद आणि धमाल कथानक हे 'गेला उडत'चं वैशिष्ट्य . पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकांनी या नाटकाला भरभरून दाद दिली आहे. दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव, अंकुश चौधरी, अमोल कोल्हे यांसारख्या मान्यवर मंडळींनीही नाटकाचं कौतुक केलं आहे.
मारुती हा तरुण लहानपणापासूनच मारुतीच्या लीलांनी प्रभावित आहे. आपल्यातही मारुतीसारखी शक्ती आली आहे, असं त्याला वाटतं. स्वत:ला तो मारुतात्मज म्हणवतो. घरच्या अडचणी आपण लीलया सोडवू अशी त्याची कल्पना असते. त्याला समजून घेता घेता त्याच्या घरच्यांच्या अडचणी वाढतात. शेवटी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. तिथली कौन्सेलर डॉ. सायली त्याला तो सामान्य माणूस असल्याची आणि त्याच्याकडे कुठलीही सुपर नॅचरल पॉवर नसल्याची जाणीव करून देते. सामान्यपणाची जाणीव झालेला मारुती घरच्या अडचणी कशा सोडवतो असं नाटकाचं कथानक आहे.