OMG ! स्वप्नील जोशी स्त्री वेशात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2017 08:01 AM2017-01-31T08:01:14+5:302017-01-31T13:32:52+5:30

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत स्त्री वेशात भूमिका करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. भाऊ कदम, सुबोध भावे, कुशल भद्रिके यांच्यापाठोपाठ आता ...

OMG! Swapnil Joshi Woman in prostitution | OMG ! स्वप्नील जोशी स्त्री वेशात

OMG ! स्वप्नील जोशी स्त्री वेशात

googlenewsNext
्या मराठी चित्रपटसृष्टीत स्त्री वेशात भूमिका करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. भाऊ कदम, सुबोध भावे, कुशल भद्रिके यांच्यापाठोपाठ आता प्रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच फुगे या चित्रपटात स्त्री वेशात दिसणार आहे. त्यामुळे त्याची ही हटके भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहे. या चित्रपटातील लाल रंगाचा ड्रेस, त्याला साजेशी अशी लाल लिपस्टिक आणि नाजूक असे काळे कानातले त्याने घातले आहे. त्याचा हा लूक पाहून स्वप्निलचे चाहते नक्कीच डोळे मोठे करतील यात शंकाच नाही.
           
        या चित्रपटाच्या माध्यमातून स्वप्नील जोशी हा पहिल्यांदाच स्त्री भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी तो हिंदीमध्ये कॉमेडी सर्कस या शोमध्ये स्त्री भूमिकेत पाहायला मिळाला होता. मराठीत अशी ही बनवा बनवी या चित्रपटापासून या ट्रेडला सुरवात झाली होती. चित्रपटाच्या कथेची गरज ओळखून त्याने हे पात्र पार केल्याचे समजत आहे. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची चर्चा खूपच रंगत आहे. तसेच सोशलमीडियावरदेखील या चित्रपटाचे जोरात प्रमोशन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये मराठी चित्रपटसृष्टील कलाकारांनीदेखील सहभाग घेतला असल्याचे दिसत आहे.या चित्रपटात सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे, नीता शेट्टी या कलाकारांचा समावेश आहे. नीता शेट्टी या अभिनेत्रीचा हा पहिलाच चित्रपट आहे.  
        इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत अश्विन आंचन, अर्जुनसिंग बºहान, कार्तिक निशानदार आणि अनुराधा जोशी यांनी फुगे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना १० फ्रेबुवारीला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. 




         

Web Title: OMG! Swapnil Joshi Woman in prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.