महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी कलाकारांचा मराठी राज्यगीत 'जय जय महाराष्ट्र माझा...'चा नवा व्हिडीओ प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 08:44 PM2023-05-01T20:44:50+5:302023-05-01T20:45:15+5:30
१ मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रेडिओ मिर्चीने मराठी मनामनातलं राज्यगीत एका नव्यारूपात, नव्या व्हिडीओद्वारे सादर केले आहे.
१ मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रेडिओ मिर्चीने मराठी मनामनातलं राज्यगीत एका नव्यारूपात, नव्या व्हिडीओद्वारे सादर केले आहे. या व्हिडिओ मध्ये प्रख्यात अभिनेत्री विभावरी देशपांडे, स्मिता गोंदकर, सेलिब्रिटी शेफ मधुरा बाचल आणि लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर, आरोह वेलणकर यांच्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील मिरची आरजे जसे की, आरजे निधी, आरजे राहुल, आरजे गौती, आरजे सौरभ, आरजे भूषण, आरजे देनिमी सुद्धा दिसणार आहेत.
हा व्हिडीओ १ मे रोजी मिरचीच्या 'मिर्ची मराठी' या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे. या गाण्याचं पुनर्निर्माण 'मिर्ची'ने केलं असून, संगीत यश पहाडे यांनी दिलं आहे आणि RJ निधी, कौस्तुभ नाईक आणि यश पहाडे यांनी गायलं आहे. या सर्वांना, मिरचीच्या कंटेंट हेड स्मिता रणदिवे आणि मिर्ची लव चे प्रोग्रामिंग हेड मंदार कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
हा व्हिडीओ नेटिव्ह कम्युनिकेशनने तयार केला. या राज्यगीताचे मूळ गायक शाहीर साबळे हे आहेत. राजा बढे यांचे शब्द आणि श्रीनिवास खळेयांनी ते संगीतबद्ध केलेलं आहे.