"अन् मी तुमच्यासोबत नाही..." पूजा सावंत रक्षाबंधनाच्या दिवशी भावंडांच्या आठवणीने गहिवरली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 04:47 PM2024-08-19T16:47:17+5:302024-08-19T16:50:03+5:30

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला एका घट्ट धाग्यात बांधून ठेवणारा सण म्हणजे रक्षाबंधन.

on the occasion of raksha bandhan marathi actress pooja sawant shared a post in memory of her siblings | "अन् मी तुमच्यासोबत नाही..." पूजा सावंत रक्षाबंधनाच्या दिवशी भावंडांच्या आठवणीने गहिवरली

"अन् मी तुमच्यासोबत नाही..." पूजा सावंत रक्षाबंधनाच्या दिवशी भावंडांच्या आठवणीने गहिवरली

Pooja Sawant Post On Raksha Bandhan: भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला एका घट्ट धाग्यात बांधून ठेवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. आयुष्यभर या धाग्याची साथ देत भाऊ हा बहिणीचे रक्षण करत असतो. वाईट गोष्टींपासून तिचे संरक्षण करण्याचे वचन तो बहिणीला देतो. बालपणापासून एकत्र मोठे झालेले हे बहीण-भाऊ आयुष्यभर एकमेकांची साथ देत आयुष्यातील गोडवा वाढवतात. हे केवळ आपल्यासोबतच नव्हे तर मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातही घडताना दिसतं. चित्रपटांमधूनही आपण भाऊ-बहिणीच्या नात्यांवरील जोड्या पाहतो. तसेच वैयक्तिक आयुष्यातही आपले लाडके कलाकार त्यांच्या भाऊ-बहिणीसोबत बाँडिंग शेअर करताना दिसतात. अशातच मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतनेरक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावंडांच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. 


पूजा सावंतने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपल्या भाऊ आणि बहिणीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये तिने लिहलंय, पहिलीच रक्षाबंधन आणि मी तुमच्यासोबत नाही आहे. मला तुम्हा दोघांची खूप आठवण येत आहे. असं म्हणत पूजाने तिचा भाऊ श्रेयस आणि बहीण रुचिराला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

महाराष्ट्राची 'कलरफूल' अभिनेत्री अशी पूजा सावंतची ओळख आहे. सध्या पूजा सावंत तिच्या वैवाहिक जीवनात व्यस्त आहे. पूजा आणि सिद्धेश फेब्रुवारी महिन्यात लग्नबंधनात अडकले. मुंबईत त्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. त्यानंतर पूजा नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. लग्नानंतरची पहिलीच रक्षाबंधन असल्याने पूजा भावंडांच्या आठवणीने गहिवरल्याचं पाहायला मिळतंय. 

Web Title: on the occasion of raksha bandhan marathi actress pooja sawant shared a post in memory of her siblings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.