'पुण्यावर पुन्हा एकदा एक भयंकर संकट कोसळलंय', अभिनेत्री मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 13:48 IST2022-04-22T13:48:00+5:302022-04-22T13:48:22+5:30
मुक्ता बर्वे (Mukta Barve)ची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

'पुण्यावर पुन्हा एकदा एक भयंकर संकट कोसळलंय', अभिनेत्री मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत!
अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve)ने मागील अनेक वर्षापासून मालिका, चित्रपट आणि नाटक या माध्यमातून आपले दमदार अभिनय कौशल्याद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यानंतर आता मुक्ता आपल्या अभिनयासोबत आपल्या आवाजाच्या जादूनेही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कथावर्णन करत ती एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे. काही दिवसापूर्वी 'स्टोरीटेल' मराठीवर तिची ‘व्हायरस -पुणे’ (Virus- Pune) ही एक सीरिज आली होती. आता याचा दुसरा भाग ‘व्हायरस -२ पुणे'(Virus 2 Pune) घेऊन ती आपल्या भेटीला आली आहे. नुकतीच तिने याची माहिती देणारी एक पोस्ट केली आहे. सध्या मुक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
एका जीवघेण्या व्हायरसच्या निमित्तानं पुण्यावर एक भयंकर संकट कोसळलंय. सगळं शहर पत्त्यांसारखं उन्मळून पडत असताना नेहाच्या मुलीला मायराला काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलंय. मायरापर्यंत पोचण्यात, तिचा शोध घेण्यात नेहा, दिव्या, सचिन यशस्वी होतील? न भूतो न भविष्यती अशा या संकटातून ते खरंच बाहेर पडतील? नियतीचा हा जीवघेणा खेळ खरंच संपेल? व्हायरस -२ पुणे या स्टोरीटेल मराठी वरील ऑडिओ सिरीज विषयीची ही तिची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. चाहते देखीलत मुक्ताच्या या नवीन सीरिजबद्दल विशेष उत्साही आहेत.
‘व्हायरस- पुणे’ या मुक्ताच्या सीरीजच्या पहिल्या सिजनला कमाल लोकप्रियता मिळाली होती आणि त्यामुळे दुसऱ्या सीजनची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुक्ताच्या दुसऱ्या सिझनला स्टोरीटेलवर अद्भुत असा प्रतिसाद मिळत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.