"एखाद्याने कष्टाने मिळवलेली प्रतिष्ठा निराधार अफवांमुळे..." ;फसवणुकीच्या आरोपावर श्रेयस तळपदेने दिले स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 21:00 IST2025-03-28T20:35:44+5:302025-03-28T21:00:11+5:30
अभिनेता श्रेयस तळपदेविरोधात (Shreyas Talpade) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

"एखाद्याने कष्टाने मिळवलेली प्रतिष्ठा निराधार अफवांमुळे..." ;फसवणुकीच्या आरोपावर श्रेयस तळपदेने दिले स्पष्टीकरण
अभिनेता श्रेयस तळपदेविरोधात (Shreyas Talpade) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. उत्तर प्रदेशमधील चीटफंड घोटाळ्याप्रकरणी तो कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. त्याच्यासोबत अन्य १४ जणांविरोधातही FIR दाखल झाला आहे. दरम्यान, आता यावर श्रेयस तलपदे याने स्पष्टीकर दिले आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता श्रेयस तळपदे याने इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर करुन त्याने आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे. 'आजच्या जगात, एखाद्या व्यक्तीची कष्टाने मिळवलेली प्रतिष्ठा निराधार अफवांमुळे अनावश्यकपणे कलंकित होते हे अत्यंत दुर्दैवी आहे. श्रेयस तळपदे यांच्यावर फसवणूक किंवा गैरवर्तनाचा आरोप करणारे अलिकडचे अहवाल पूर्णपणे खोटे, निराधार असल्याचे यामध्ये म्हटले आहे.
श्रेयस तळपदे अडचणीत, उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केली FIR; नक्की प्रकरण काय?
श्रेयस तळपदेच्या पोस्टमध्ये काय आहे?
पोस्टमध्ये श्रेयस तळपदे म्हणाला की, 'आजच्या जगात, एखाद्या व्यक्तीची कष्टाने मिळवलेली प्रतिष्ठा निराधार अफवांमुळे अनावश्यकपणे कलंकित होते हे अत्यंत दुर्दैवी आहे. श्रेयस तळपदे यांच्यावर फसवणूक किंवा गैरवर्तनाचा आरोप करणारे अलिकडचे अहवाल पूर्णपणे खोटे, निराधार आहेत.
'एक सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून, इतर अनेक सेलिब्रिटींप्रमाणे, तळपदे यांना वारंवार विविध कॉर्पोरेट आणि वार्षिक कार्यक्रमांना आमंत्रित केले जाते, ज्यात ते शक्य तितक्या वेळा उपस्थित राहतात. अशा उपस्थितीव्यतिरिक्त, त्यांचा संबंधित कंपनीशी कोणताही संबंध नाही. हे सांगण्याची गरज नाही, तळपदे यांच्यावरील आरोप आणि/किंवा प्रसारित होणाऱ्या कोणत्याही फसव्या किंवा बेकायदेशीर कृत्यांशी कोणताही संबंध नाही, असं स्पष्टीकरण या पोस्टमध्ये देण्यात आले आहे.
"आम्ही सर्वांना विनंती करतो की, चुकीची माहिती पसरवण्यापूर्वी तथ्ये पडताळून पहा आणि तळपदे यांचे नाव या निराधार अफवांपासून दूर ठेवावे अशी विनंती करतो. तळपदे हे कायद्याचे पालन करणारे नागरिक आहेत जे त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये सचोटी, प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकतेचे सर्वोच्च मानक राखण्यासाठी वचनबद्ध असतात, असंही या पोस्टमध्ये म्हटले आहे.
टीम श्रेयस तळपदे