परदेशात सर्वाधिक शूटिंग केलेला गश्मीर महाजनी ठरला एकमेव अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 16:50 IST2017-04-17T12:51:54+5:302017-04-19T16:50:37+5:30
दर्जेदार कथा आणि आशयघन विषयासह सिनेमात दाखवण्यात येणा-या लोकेशन्सचे अचूक निवड करतात.त्यामुळे परदेशातील आकर्षक आणि तितकंच प्रेमात पाडणा-या सुंदर ...

परदेशात सर्वाधिक शूटिंग केलेला गश्मीर महाजनी ठरला एकमेव अभिनेता
द ्जेदार कथा आणि आशयघन विषयासह सिनेमात दाखवण्यात येणा-या लोकेशन्सचे अचूक निवड करतात.त्यामुळे परदेशातील आकर्षक आणि तितकंच प्रेमात पाडणा-या सुंदर अशा लोकेशन्सवर मराठी सिनेमांचं चित्रीकरण होऊ लागलंय. सिनेमा रसिकांप्रमाणेच कलाकरांसाठीही नक्कीच सुखावणारी गोष्ट म्हणावी लागेल.अभिनेता गश्मीर महाजनी देखील परदेशातील लोकेशन्सच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळतंय.त्याला कारणही तसेच आहे.गश्मीर महाजनीने मराठी चित्रपटसृष्टीत 2015 ला रिलीज झालेल्या ‘कॅरी ऑन मराठा’ सिनेमातून पाऊल ठेवलं. गेल्या दोन वर्षांत त्याचे चार मराठी सिनेमे रिलीज झाले आहेत. आणि आता लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘रूबिक्स क्यूब’ आणि समीर विव्दंस दिग्दर्शित आगामी चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहेत.अमोल शेटगे दिग्दर्शित ‘वन वे तिकीट’ चित्रपटासाठी गश्मीर महाजनीने इटली, स्पेन आणि फ्रान्स देशांसह इतर देशांमध्ये चित्रीकरण केले आहे. तर ‘रूबिक्स क्यूब’ स्लोव्हेनिया, इटली, आणि स्वित्झर्लंड येथे चित्रित केला आहे.सूत्रांच्या अनुसार, दोन्ही चित्रपटांसाठी गश्मीर महाजनी प्रत्येक देशात किमान आठ दिवस राहून आला आहे. करीयरला आत्ताच सुरूवात झाली असताना, दोन वर्षांमध्ये पाच देशांमध्ये जाऊन शूटिंग केलेला तो एकमेव मराठी कलाकार ठरला आहे.गश्मीर याविषयी सांगतो,“मी शूटिंग केलेल्या परदेशांमध्ये स्लोवेनियाचे पिरॅन आणि इटलीचे बार्ड शहर माझे सर्वात आवडते आहे. पिरॅन समुद्राकाठी वसलेले आहे.मी समुद्राला लागूनच असलेलेल्या हॉटेलमध्ये राहायचो. दररोज शूटिंग पॅकअप झाल्यावर मी बीचवर फिरायला जायचो. समुद्राकाठच्या बीचवर बसून भव्य क्षितीजाकडे पाहत राहणे,तसेच परदेशातील संस्कृती माहिती जाणून घेण्यात रस असल्याचे गश्मिरने सांगितले आहे. तर इटलीतले बार्ड शहराला सुंदर वारसा लाभला आहे.बार्डच्या शहरात फिरताना गॉडफादर चित्रपटातल्या सिसिलीयन शहराची मला आठवण व्हायची.”
![]()