'फक्त मध्यमवर्गीयच असे बोटांवर...', प्राजक्ता माळीची पोस्ट आली चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 17:13 IST2022-09-14T17:13:07+5:302022-09-14T17:13:41+5:30
Prajakta Mali: प्राजक्ता माळीने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून ब्रेक घेऊन थेट लंडन गाठले आहे.

'फक्त मध्यमवर्गीयच असे बोटांवर...', प्राजक्ता माळीची पोस्ट आली चर्चेत
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali)ने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते आणि ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरील तिची पोस्ट चर्चेत येत असते. दरम्यान अभिनेत्रीनं इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, फिरायला मिळालेला इंग्लंड हा तेरावा देश. (खात्री आहे, फक्त मध्यमवर्गीयच असे बोटांवर देश मोजत असणार… एक आईबरोबरची दुबई ट्रिप सोडल्यास सगळ्या ट्रिप्स कामानिमित्त किंवा स्पॉन्सर्ड होत्या, देवाचे किती म्हणून आभार मानू. #मध्यमवर्गीयांचीसुखं.
तिने पुढे म्हटले की, स्वतःच्या अथवा इतरांच्या पैशाने, कसही चालेल; पण सगळे देश फिरायची इच्छा आहे…जगच काय, चंद्र- मंगळ, अंतराळसुद्धा बघण्याची इच्छा आहे…अर्थात; देव जे जे दाखवेल ते आणि तेवढंच बघायला (भोगायला- त्यागायला) तयार आहे. चला आता फार फिलॅासॅाफी झाडत बसत नाही, लंडनवारीचे फोटो शेअर करत राहीन. तुम्हीही व्हर्चुअल वारी करून घ्या.
वर्कफ्रंट...
सध्या प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते आहे. कार्यक्रमाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला काही दिवसांपूर्वी भेटीला आला आहे. या कार्यक्रमातून ब्रेक घेऊन प्राजक्ताने थेट लंडन गाठले आहे. ती मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली आहे. तिच्यासोबत अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्ववादी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता ऋषिकेश जोशी सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.