महाराष्ट्रातले ए.टी.एम.देवासाठी झाले खुले,वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 10:53 AM2017-11-04T10:53:24+5:302017-11-04T16:23:24+5:30

सिनेमाचं प्रमोशन करण्याचे निरनिराळे फंडे चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात... छोट्या पडद्यावरच्या शोमध्ये येऊन सिनेमाचं प्रमोशन करण्याचा फंडा हिट झाला असताना  ...

Open for ATM Deities in Maharashtra, read detailed | महाराष्ट्रातले ए.टी.एम.देवासाठी झाले खुले,वाचा सविस्तर

महाराष्ट्रातले ए.टी.एम.देवासाठी झाले खुले,वाचा सविस्तर

googlenewsNext

/>सिनेमाचं प्रमोशन करण्याचे निरनिराळे फंडे चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात... छोट्या पडद्यावरच्या शोमध्ये येऊन सिनेमाचं प्रमोशन करण्याचा फंडा हिट झाला असताना  देवा या आगामी मराठी सिनेमाने मात्र वेगळी वाट धरलीय.मोठा गाजावाजा न करता शांततेत देवा या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.आता तुम्हीही विचारात पडला असणार की शांततेत जोरदार प्रमोशन कसं बरं होत असेल ? तस होय, देवा सिनेमाने प्रमोशसाठी एक भन्नाट कल्पना शोधुन काढली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राच्या २००हून अधिक ए.टी.एम. मध्ये या सिनेमाचा टीझर दाखविला जात आहे. हा टीझर २० सेकंदाचा असून, यामार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘देवा’ सिनेमाचा बोलबाला केला जात आहे. विशेष म्हणजे, ए.टी.एम.द्वारे अशाप्रकारे सिनेमाचा टीझर दाखवण्याची हि पहिलीच वेळ असून,ह्या अतरंगी संकल्पनेचे कौतुकदेखील होताना दिसून येत आहे.आपल्या अभिनयाबरोबरच भूमिकेतदेखील नाविण्यपण जपणाऱ्या अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाची अशी होत असलेली प्रसिद्धी,प्रसारमाध्यमांत चर्चेचा विषय ठरत आहे.

साऊथचे दिग्दर्शक मुरली चार्ली या मल्याळम  सिनेमाचा देवा सिनेमा मराठी  रिमेक आहे.सिनेमात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहे. साऊथचा सिनेमा मराठीत करायचा हा विचार घेऊन आलेले दिग्दर्शक मुरली यांना कोकणाच्या सौंदर्याने भुरळ घातली असावी. म्हणुनच की काय या चित्रपटाचे चित्रीकरण  त्यांनी  कोकणातील नयनरम्य स्थळांवर केले आहे. त्यामुळे देवा सिनेमात कोकणाचे निसर्गसौदर्यही रसिकांना प्रेमात पाडेल यांत शंका नाही.देवा हा साऊथच्या सिनेमाचा रिमेक असला तरी तो मराठमोळ्या पद्धतीने दाखविण्याचा दिग्दर्शकांचा प्रयत्न असेल.  देवा या पात्राभोवती संपुर्ण सिनेमाची  कथा फिरते. असल्याने यामध्ये देवाचा म्हणजेच अंकुशचा प्रवास दाखविण्यात आला असून हा सिनेमा १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.डॉ. मोहन आगाशे,वैभव मांगले,पंढरीनाथ कांबळे, मयूर पवार या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

Web Title: Open for ATM Deities in Maharashtra, read detailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.