"आमच्या 'ही'च प्रकरण"च्या प्रयोगादरम्यान अवयवदानाची केली जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 06:55 PM2018-11-13T18:55:11+5:302018-11-13T18:59:12+5:30

आमच्या 'ही' च प्रकरण ह्या नाटकाचा प्रयोग नुकताच माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरमध्ये प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला.

 Organizational awareness was done during the experiment of our 'This Case' | "आमच्या 'ही'च प्रकरण"च्या प्रयोगादरम्यान अवयवदानाची केली जनजागृती

"आमच्या 'ही'च प्रकरण"च्या प्रयोगादरम्यान अवयवदानाची केली जनजागृती

googlenewsNext

एकदंत प्रकाशित आणि अष्टविनायक निर्मित आमच्या 'ही' च प्रकरण ह्या नाटकाचा प्रयोग नुकताच माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरमध्ये प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला. अभिनेता निखिल रत्नपारखी, नंदिता पाटकर, भार्गवी चिरमुले, आनंद काळे आणि त्याच्या टिमच्या तुफान अभिनयासोबत, प्रेक्षकांनी दिलेल्या तितक्याच उत्स्फूर्त प्रतिसादाने, नाटकाचा प्रयोग अक्षरश: "हाऊसफुल्ल" वाजला. गेल्या पाच वर्षांपासून "सान्वी एंटरटेनमेंट हाऊस" अशाच एकापेक्षा एक दर्जेदार नाटकांचे आयोजन करत आली आहे. त्याचसोबत कलेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या "सान्वी एंटरटेनमेंट हाऊस"ने आजवर कुष्ठरोग्यांच्या पुर्नवसन, आदिवासी मुलांच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच विद्यार्थी दत्तक योजना असे सामाजिक उपक्रमासाठी नाटकाच्या माध्यमातून मदतनिधी देखील उभारला आहे.

दरवेळेस प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याच्या उद्देशाने नवनवीन प्रयोग करून नाट्यक्षेत्रात "सान्वी एंटरटेनमेंट हाऊस"ने आपली स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावेळेसही आपल वेगळेपण जपत सान्वी एण्टरटेनमेंट हाऊसने आमच्या 'ही' च प्रकरण या नाटकाच्या प्रयोगाच्या दरम्यान, अवयव दान एक जनजागृती अभियानदेखील यशस्वीरीत्या पार पडले. या अभियानासाठी सान्वीसोबत, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने देखील उपस्थित होते. त्यांनी नाटकाच्या मध्यंतराच्या दरम्यान प्रेक्षकांना अवयव दाना संबंधी प्रबोधन आणि आवाहन केले. डॉक्टरांच्या या आवाहनाला भार्गवी चिरमुले, त्यांच्या आई, नंदिता पाटकर आणि मयुरेश खोले या कलाकारांसह बऱ्याच प्रेक्षकांनी तिथे उपस्थित असलेल्या जे.जे हॉस्पिटलच्या टीमकडे अवयवदान संबंधी फॉर्म भरून आपला सहभाग दर्शवला. सान्वीच्या या उपक्रमात जे.जे. हॉस्पिटलचे  सुनील चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

नाट्यक्षेत्रात एखादया नाटकाच्या प्रयोगादरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांच्या सहभागाने एका सामाजिक जनजागृती अभियानाला इतका प्रचंड प्रतिसाद  मिळण्याची आजवरची ही पहिलीच वेळ असावी. याच सोबत या नाटकाच्या तिकीट विक्रीतून जमा झालेल्या रकमेतील काही भाग हा स्वस्तिक फाउंडेशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे तालुक्यातील "दिविजा" वृद्धाश्रमाला मदतनिधी म्हणून देण्यात आला. मनोरंजनाच्या माध्यमातून सामजिक बांधिलकी जपण्याच्या आपली ही परंपरा या पुढील आपल्या वाटचालीत ही आम्ही अशीच कायम राखू असे "सान्वी एंटरटेनमेंट हाऊस" चे विकास मोजर, संतोष शिंदे आणि अमोल परब यांनी सांगितले.

Web Title:  Organizational awareness was done during the experiment of our 'This Case'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.