सिनेरसिकांचं मनोरंजन हेच आमचं ध्येय- सुशीलकुमार अग्रवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 11:48 AM2022-11-07T11:48:31+5:302022-11-07T11:58:23+5:30

अल्ट्राच्या बॅनरखाली आगामी वर्षभरात रोमान्स, विनोदी, कौटुंबिक मनोरंजक, सामाजिक,पौराणिक, भयपट, साहसपट अशा वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे.

Our goal is to entertain the audience - Sushil Kumar Agarwal | सिनेरसिकांचं मनोरंजन हेच आमचं ध्येय- सुशीलकुमार अग्रवाल

सिनेरसिकांचं मनोरंजन हेच आमचं ध्येय- सुशीलकुमार अग्रवाल

googlenewsNext

मराठी चित्रपटाच्या बदलत्या शैलीमुळे सिनेमात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या रुपेरी पडद्यावर वैविध्यपूर्ण चित्रपटांची प्रभावी निर्मिती सातत्याने होत असताना अनेक नवे निर्माते व प्रस्तुतकर्ते मराठी चित्रपटांसाठी पुढे येत आहेत. खरेतर या सिनेमाच्या माध्यमातून बहुविध आशय-विषय आल्यामुळे प्रेक्षकवर्ग हा सिनेमागृहाकडे वळायला लागला.   

 अल्ट्राच्या बॅनरखाली आगामी वर्षभरात रोमान्स, विनोदी, कौटुंबिक मनोरंजक, सामाजिक,पौराणिक, भयपट, साहसपट अशा वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे. उत्तम कलाकार, दिग्दर्शक, निर्माता, संगीत दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावान नवोदितांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचा उद्देशाने अल्ट्राने हे पाऊल उचलले आहे. या अनुषंगाने 'कुलस्वामिनी' चित्रपट ११ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटातून  देवीची अगाध लीला प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तसेच चित्रपटाचं कथानक हे सिनेरसिकांना सिनेमागृहातचं अलगद हात जोडायला लावेल. 
 
या निमित्ताने ‘अल्ट्रा मीडिया अ‍ॅण्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’कंपनीचे एमडी आणि सीईओ श्री. सुशीलकुमार अग्रवाल, यांनी मराठी चित्रपटसृष्टीविषयी आपले मत मांडले आहे ते म्हणतात की, अल्ट्रा च्या माध्यमातून रसिकप्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक एव्हरग्रीन चित्रपटांची प्रस्तुती करत आलेलो आहोत. निर्माता म्हणजे फक्त पैसा देणारा असं नसतं तर पैशाच्या योग्य नियोजनाबरोबर कलाकारांपासून ते प्रसिद्धीपर्यंत सर्व विभागातलं व्यवस्थापन पहावं लागतं. या क्षेत्रात काम करायचे असेल तर कष्ट करायची तयारी ठेवायला पाहिजे. प्रेक्षकांची वाढती अभिरुची लक्षात घेऊन वेगळ्या धाटणीच्या चित्रपट निर्मितीचा व प्रस्तुतीचा आमचा कल आहे. जो चोखंदळ रसिक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्रात इतके वर्ष राहात असल्यानं इथल्या संस्कृतीविषयी माझ्या मनात अत्यंत आदर व प्रेम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 'कुलस्वामिनी' चित्रपटाची निर्मिती अल्ट्रा मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड असून क्रिएटीव्ह प्रोड्यूसर श्री. रजत अग्रवाल आणि  लेखन अभिजित जोशी यांनी केले तर  दिग्दर्शन जागेश्वर ढोबळे यांचे आहे. हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून याद्वारे देवीमातेचा अगाध महिमा रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. या चित्रपटातून महाराष्ट्राचे लाडके ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे आणि 'दौलत की जंग' या चित्रपटातून अभिनयाची कारकीर्द असलेली अभिनेत्री चित्रा देशमुख यांची प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे.

मनोरंजनविश्वात काम करत असताना अल्ट्रामार्फत अनेक उमदया नवीन कलाकारांना पडदयावर येण्यास संधी दिली. खरंतर गोंदया मारतंय तंगडं, लोणावळा बायपास आणि होऊन जाऊ दे, रौद्र, कुलस्वामिनी  यांसारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती करत अल्ट्राने यशाचे मापदंड अधोरेखित केलं आहे.  भविष्यात अल्ट्रा नवीन चित्रपटांची निर्मितीसह नव्या गाण्यांचे अल्बम आणण्याचा मानस असून नावीन्यपुर्ण कथेचा विचार करण्यात येत आहे.
 

Web Title: Our goal is to entertain the audience - Sushil Kumar Agarwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.