​‘परतु’ अम्मोनॉईट अवॉर्डने सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2016 10:11 AM2016-05-28T10:11:52+5:302016-05-28T15:41:52+5:30

वेगळ्या धाटणीच्या सत्य कथेवर आधारित असलेल्या आणि भावनिक मूल्यांचे अनोखे दर्शन देणाऱ्या  हॉलीवूडच्या 'इस्ट वेस्ट फिल्म्स' या नामांकित कंपनीच्या ...

'Pahutu' Ammonium award honored | ​‘परतु’ अम्मोनॉईट अवॉर्डने सन्मानित

​‘परतु’ अम्मोनॉईट अवॉर्डने सन्मानित

googlenewsNext
गळ्या धाटणीच्या सत्य कथेवर आधारित असलेल्या आणि भावनिक मूल्यांचे अनोखे दर्शन देणाऱ्या  हॉलीवूडच्या 'इस्ट वेस्ट फिल्म्स' या नामांकित कंपनीच्या 'परतु' या मराठी चित्रपटाला कॅनडातील हिडन जेम्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी अम्मोनॉईट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन अडसूळ यांना दुर्मिळ दगडापासून तयार केलेला अम्मोनाईट अवॉर्ड प्रदान करून गौरविण्यात आले.

 नितीन अडसूळ म्हणाले, 'कॅनडातील हिडन जेम्स फेस्टीव्हमध्ये 'परतु' या चित्रपटाला अम्मोनॉईट अवॉर्डने गौरविण्यात आले ही माज्यासाठी व परतु टिमसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेला हा सन्मान पाहून खूप खूप आनंद होत असल्याची भावना ही त्यांनी व्यक्त केली. परतू टिमने एक दजेर्दार फिल्म तयार करण्यासाठी वापरलेली उर्जा व मेहनतीचे फळ या अम्मोनाईट अवॉर्डच्या माध्यमातून मिळाले असून जसे बीज पेरावे तसे फळ येती हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे'.

या चित्रपटाची कथा क्लार्क मॅकमिलिअन, नितीन अडसूळ व डेरेल कॉक्स यांनी लिहिली असून याचे मराठी संवाद लेखन मयुर देवल यांनी केलं आहे. सत्यकथेवर आधारित असलेल्या 'परतु' चित्रपटात १९६८ ते १९८५ दरम्यानचा काळ रेखाटण्यात आला असून प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचा कथाविषय या निमित्ताने पहाता आला. संजय खानझोडे यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले असून संगीतकार शशांक पोवार यांनी चित्रपटाला साजेशी संगीताची साथ दिली आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी 'परतु' चित्रपटाचे थीम साँग गायले असून ग्रेग सिम्स या हॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत संयोजकाने 'परतु' ला पार्श्वसंगीत दिले आहे.

संकलनाची जबाबदारी राजेश राव यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे कार्यकारी निमार्ते म्हणून नितीन अडसूळ, सचिन अडसूळ, रुपेश महाजन, डेरेल कॉक्स, क्लार्क मॅकमिलिअन यांनी काम पाहीले आहे. नात्यांमधील अनोखे बंध 'परतु' चित्रपटात पाहायला मिळतात. किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री सोहम, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला, रवी भारतीय आणि बालकलाकार यश पांडे अशा दिग्गज कलाकारांच्या 'परतु'  सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

 

Web Title: 'Pahutu' Ammonium award honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.