'नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 12:50 PM2019-01-02T12:50:51+5:302019-01-02T12:52:43+5:30

भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचे नवीन गाणे 'पाखरू' प्रदर्शित झाले आहे.

Pakharu Song from 'Nashibwan' movie will be released | 'नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

'नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

googlenewsNext
ठळक मुद्दे'नशीबवान' चित्रपटातील नवीन गाणे 'पाखरू' प्रदर्शित'नशीबवान' चित्रपट ११ जानेवारी रोजी होणार प्रदर्शित

भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचे नवीन गाणे 'पाखरू' प्रदर्शित झाले आहे. लँडमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती असलेला 'नशीबवान' हा चित्रपट येत्या ११ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

एक सामान्य माणूस आपल्या बायको, मुलांना घेऊन जेव्हा प्रथमच बाहेर फिरायला निघतो तेव्हा तो  मॉलमध्ये जातो. आजच्या काळात महत्त्वाची ठरत असलेल्या मॉल संस्कृतीत तो जेव्हा फिरतो तेव्हा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला 'मॉलचे' खूप अप्रूप वाटते. संपूर्ण मॉल नजरेने न्याहळताना त्याच्या नजरेत असलेली उत्सुकता आणि आनंद आपल्याला गाणे पाहताना जाणवते. सामान्य माणूस पैशाअभावी जो आनंद स्वतः घेऊ शकत नाही आणि परिवाराला देऊ शकत नाही. तो आनंद पैसे मिळाल्यामुळे कुटुंबाला देण्याचा प्रयत्न भाऊ कदम या गाण्यात करताना दिसत आहे. छान तयार होऊन आजूबाजूच्या लोकांना आनंदाने जोरात सांगत भाऊ आणि त्याचे कुटुंब बाहेर फिरायला जाते. मॉल फिरून झाल्यानंतर  मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करताना भाऊ कदम आणि परिवार दिसत आहे. या गाण्यात दिग्दर्शकाने अगदी छोट्या छोट्या गोष्टी टिपल्या आहेत. या गाण्यात भाऊ कदम, मिताली जगताप - वराडकर यांचे प्रचंड बोलके दिसणारे  डोळे. त्यात शाल्मली खोलगडेचा भारदस्त आवाज, सोहम पाठक यांचे अप्रतिम संगीत आणि जोडीला शिवकुमार ढाले यांचे अर्थपूर्ण शब्द. एवढे सगळे उत्तम जुळून आल्यानंतर हे गाणे पाहिल्यावर फक्त एकच प्रतिक्रिया तोंडातून निघते आणि ती म्हणजे निव्वळ अप्रतिम.      


फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी निर्मित 'नशीबवान' या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील यांनी निर्मात्यांची  धुरा सांभाळली असून प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना भाऊ कदम यांच्यासोबत मिताली जगताप - वराडकर, नेहा जोशी, राजेश शृंगारपुरे, अतुल आगलावे आदींचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

Web Title: Pakharu Song from 'Nashibwan' movie will be released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.