रिअल लाइफमध्ये आहे PSI अधिकारी, आता लवकर अभिनेत्री म्हणून झळकणार सिनेमात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 09:00 AM2021-09-17T09:00:00+5:302021-09-17T09:00:00+5:30
घरची परिस्थीतीही बेताचीच. संघर्षातून वाट काढत पल्लवीने पीएसआय बनली. गेल्या पाच वर्षापासून पल्लवी जाधव महाराष्ट्र पोलीस दलात पीएसआय म्हणून कार्यरत आहे.
अभिनय क्षेत्रात काम करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. कोणाला गायनाची आवड असते तर कोणाला अभिनयाची. प्रत्येकालाच आपले स्वप्न पूर्ण करायला संधी मिळत नाही. पण संधी मिळताच त्याचे सोनं करणारीही अनेक उदाहरणं इंडस्ट्रीत पाहायला मिळतात.
रिअल लाईफमध्ये पीएसआय असणारी पल्लवी जाधव लवकर तिच्या अभिनयाची आवड पूर्ण करणार आहे. एका सिनेमात ती अभिनेत्री म्हणून रसिकांच्या भेटीला येणार असे म्हटले जात आहे. याविषी अधिक माहिती समोर आलेली नसली तरी पीएसआय असणारी पल्लवीला रुपेरी पडद्यावर पाहणे नक्कीच वेगळा अनुभव असणार हे मात्र नक्की.
पल्लवी जाधव ही मुळची औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील रहिवासी आहे. घरची परिस्थीतीही बेताचीच. संघर्षातून वाट काढत पल्लवीने पीएसआय बनली. गेल्या पाच वर्षापासून पल्लवी जाधव महाराष्ट्र पोलीस दलात पीएसआय म्हणून कार्यरत आहे.
पीएसआय अणारी पल्लवीला अभिनयाचीही तितकीच आवड होती. कलेची आवड तिला स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर आता तिचे अभिनेत्री बनण्याचेही स्वप्न पूर्ण होत आहे. लहानपणापासूनच पल्लवी अभ्यासातही हुशात होती. त्यामुळे आई- वडिलांनीही तिची शिक्षणाची आवड पूर्ण करु दिली. पीएसआय बनण्यापर्यंतचा पल्लवीचा प्रवास काही सोपा नव्हता.
कारण इतरांचेही टोमणे तिला त्यावेळी ऐकायला लागायचे. मात्र या कडे फार काही लक्ष न देता. पल्लवी आपल्या कामावर लक्षकेंद्रित करत गेली आणि तिला यश मिळाले. इतरांसाठीही पल्लवी आज प्रेरणादायी बनली आहे. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता आपले काम करत राहणे याच गोष्टीचा पल्लवीने निर्धार केला असावा. जिद्द, मेहनत आणि चिकाटी यामुळेच आज पल्लवीचा तिच्या कुटुंबालाही अभिमान वाटतो.
सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते. आपले फोटो व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. मुळात ती दिसायलाही फार सुंदर आहे. सोशल मीडियावर तिचा प्रत्येक अंदाज तिच्या मित्र मंडळींना पसंतीस पात्र ठरतो.
मुळात पीएसआय असलेली पल्लवी रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरसही आहे. वेगवेगळ्या गोष्टी करण्यात ती स्वतःला बिझी ठेवत असते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ती मार्गदर्शन देखील करत असते.