​पल्लवी पाटील झळकणार तेरे लिये अल्बममध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2017 11:24 AM2017-04-29T11:24:36+5:302017-04-29T16:54:36+5:30

रुंजी या मालिकमुळे पल्लवी पाटील नावारूपाला आली. या मालिकेतील तिने साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. या मालिकेने काहीच महिन्यांपूर्वी ...

Pallavi Patil will be seen in the album for you | ​पल्लवी पाटील झळकणार तेरे लिये अल्बममध्ये

​पल्लवी पाटील झळकणार तेरे लिये अल्बममध्ये

googlenewsNext
ंजी या मालिकमुळे पल्लवी पाटील नावारूपाला आली. या मालिकेतील तिने साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. या मालिकेने काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पल्लवीने धनगरवाडा या चित्रपटातदेखील काम केले होते. या चित्रपटातील तिची भूमिका ही रुंजीपेक्षा पूर्णपणेच वेगळी आहे. पल्लवी एकाच साच्यातील भूमिका न करता वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे पसंत करते. पल्लवी काहीच महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकली आहे. तिने लग्नानंतर प्रेम हे या मालिकेत काम केले होते आणि आता ती एका अल्बमममध्ये झळकणार आहे.
पल्लवी पाटीलची अल्बममध्ये काम करण्याची ही काही पहिली वेळ नाही. तिने पूर्वी ब्रेकअप के बाद या अल्बममध्ये काम केले होते आणि आता ती तेरे लिये या अल्बममध्ये दिसणार असून या अल्बमची गाणी सागर या गायकाने गायली आहेत. या अल्बमचे पहिले पोस्टर काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहे. या अल्बममध्ये तिच्यासोबत प्रेक्षकांना अभिजीत आमकरलादेखील पाहाता येणार आहे. अभिजीत सध्या नकटीच्या लग्नाला सावधान या मालिकेत काम करत आहे. तेरे लिये या अल्बमच्या अनुभवाविषयी पल्लवी सांगते, हा एक हिंदी अल्बम असून याचे चित्रीकरण करायला मला खूपच मजा आली. या अल्बमचे चित्रीकरण आम्ही वडाळ्यामधील एका गोडाऊनमध्ये केले. त्यामुळे चित्रीकरणाचा अनुभव माझ्यासाठी खूपच वेगळा होता. या अल्बमचे चित्रीकरण खूपच वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेले आहे. याचे अधिकाधिक चित्रीकरण ड्रॉनवर करण्यात आले आहे. हा व्हिडिओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडेल याची मला खात्री आहे. 

Web Title: Pallavi Patil will be seen in the album for you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.