गझल सम्राट पंकज उदास यांचे मराठीत पदार्पण, कविता पौडवाल यांच्यासह गायले भावगीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 08:00 PM2019-11-23T20:00:00+5:302019-11-23T20:00:00+5:30

बॉलिवूड गायिका कविता पौडवाल ‘रंग धनूचा झुला’ हे भावगीत सादर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. गझल गायक पंकज उदास यांच्यासोबत त्यांनी हे गाणे गायले आहे.

Pankaj Udas Made His Marathi debut, sung with Kavita Poudwal | गझल सम्राट पंकज उदास यांचे मराठीत पदार्पण, कविता पौडवाल यांच्यासह गायले भावगीत

गझल सम्राट पंकज उदास यांचे मराठीत पदार्पण, कविता पौडवाल यांच्यासह गायले भावगीत

googlenewsNext

भारतीय संगीत अनेक लोकप्रिय प्रकारांच्या माध्यमातून सादर करण्यात येते. यापैकी काही संगीतप्रकार सर्वांनाच आवडतात. स्थानिक संगीताकडे श्रोत्यांचा कल वाढत असून ते मराठी संगीताकडे आता नव्या दृष्टीने पाहत आहेत. पंजाबी, गुजराती, मराठी संगीत, नाटक आणि चित्रपट यांची सगळीकडेच प्रशंसा होताना दिसत आहे. अभंग आणि पोवाड्यांप्रमाणेच मराठी भावगीत हा असा एक संगीत प्रकार आहे जो गेल्या ८५ वर्षांमध्ये बहरला आहे आणि जगभरातील मराठी संगीतप्रेमी या संगीतप्रकाराचा आनंद घेत आहेत.


मिलेनिअल्सना या वैशिष्ट्यपूर्ण संगीतप्रकाराचा आनंद घेता यावा यासाठी पुरस्कार विजेत्या गायिका अनुराधा पौडवाल यांच्या कन्या आणि प्रख्यात बॉलिवूड गायिका कविता पौडवाल ‘रंग धनूचा झुला’ हे भावगीत सादर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.  गझल गायक पंकज उदास यांच्यासोबत त्यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याच्या निमित्ताने पंकज उदास हे प्रथमच मराठी रचना सादर करणार आहेत.‘रंग धनुचा झुला’ या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत दिले आहे आणि गीतकार मंदार चोळकर यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे.


‘रजनीगंधा जीवनी या’ यासारख्या अनेक भावगीतांचे संगीतकार दिवंगत अरूण पौडवाल यांचा प्रभाव असलेल्या आणि अशोक पत्की व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतापासून प्रेरणा घेत कविता पौडवाल यांनीही आता भावगीत गायनाकडे आपला ओढा वळवला आहे. कविता पौडवाल म्हणतात, “पंकज उदास यांच्यासोबत मराठी भावगीत सादर करावे ही माझ्या आईची म्हणजे अनुराधा पौडवाल यांची इच्छा होती. कारण मराठी भावगीतासाठी त्यांची गायन शैली अत्यंत साजेशी आहे. ते जगभरात लोकप्रिय आहेत आणि त्यांचे संगीत चिरंतन टिकणारे आहे. हे सगळे घटक आणि अशोक पत्की यांच्या अवीट गोडीच्या संगीतरचनेची सांगड घालत आम्ही पारंपरिक संगीत आणि समकालीन बाज यांचा संयोग या निमित्ताने घडवून आणला आहे. ‘चिठ्ठी आई है’सारखी त्यांची गाणी अत्यंत लोकप्रिय होती आणि त्यांची गायनशैली भावगीत या प्रकाराला साजेशी आहे.”


प्रसिद्ध गझलकार पंकज उदास पुढे म्हणाले, “मी महाराष्ट्रात मुंबईत राहून देखील एवढी वर्ष कधीच मराठी गाण गायल नाही. माझ्या तीन दशकांच्या सांगीतिक कारकिर्दीत मी सर्व भाषेत गाणी गायली आहेत पण प्रथमच मी मराठी गाण  गात आहे. कविता आणि अशोक पत्की यांच्या समवेत हे अत्यंत मधुर गीता गाताना मला खूप समाधान लाभले. गीतकार मंदार चोळकर यांनी  अतिशय सुंदर शब्दात हे गाण लिहाल आहे. जगभरातील संगीत चाहत्यांना  हे गाणे आवडेल, अशी मला खात्री आहे.”


या गाण्यांसाठी ध्वनीचा बाज आधुनिक आहे आणि त्याचा गोडवा पारंपरिक आहे. त्यामुळे हे गाणं ऐकायला अत्यंत मधुर आहेत. पंकज उदास यांच्या आवाजामुळे श्रोत्यांनाही भावगीताचा पैलू जाणवेल. सहजसुंदर रचना करण्यात अशोक पत्की यांचा हातखंडा आहे. कारण त्यांना श्रोत्यांची नस अचूक माहीत आहे आणि कविता पौडवाल यांच्या खेळकर आवाजाने या गाण्यांमध्ये अजून गमंत आणली आहे. त्यामुळे ही गाणी श्रोत्यांना निश्चित आवडतील.


कविता पौडवाल पुढे म्हणाल्या, “इंटरनेटमुळे विविध प्रकारचे संगीत सहज उपलब्ध झाले आहे. चित्रपटबाह्य संगीतामुळे आम्हाला केवळ चित्रपटातील गीतांवर अवलंबून राहण्याची गरज राहिली नाही आणि या क्षेत्रात आम्ही नावीन्यपूर्ण प्रकारच्या सांगीतिक रचना करू शकतो आणि दिग्गजांच्या साथीने गाणी तयार करू शकतो. हे गाणे सर्वांनाच आवडेल, अशी मी आशा करते.”

Web Title: Pankaj Udas Made His Marathi debut, sung with Kavita Poudwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.