'विषय हार्ड' सिनेमातून फ्रेश जोडी भेटीला, पर्ण पेठे आणि सुमित पहिल्यांदाच आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 07:29 PM2024-05-30T19:29:01+5:302024-05-30T19:29:16+5:30

Vishay Hard Movie : अनोख्या प्रेमाची अनोखी कथा सांगणारा 'विषय हार्ड' हा मराठी चित्रपट येत्या ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Parn Pethe and Sumit came together for the first time as a fresh couple from the movie 'Vishay Hard' | 'विषय हार्ड' सिनेमातून फ्रेश जोडी भेटीला, पर्ण पेठे आणि सुमित पहिल्यांदाच आले एकत्र

'विषय हार्ड' सिनेमातून फ्रेश जोडी भेटीला, पर्ण पेठे आणि सुमित पहिल्यांदाच आले एकत्र

अनोख्या प्रेमाची अनोखी कथा सांगणारा 'विषय हार्ड' हा मराठी चित्रपट येत्या ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बर्डबॅाय एन्टरटेन्मेंट आणि कोल्हापूर टॅाकिज या बॅनरखाली 'विषय हार्ड'ची निर्मिती गीतांजली सर्जेराव पाटील, सर्जेराव बाबूराव पाटील आणि सुमित पाटील यांनी केली आहे. सुमित यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, कथालेखनाची जबाबदारीही सांभाळली आहे. 

'विषय हार्ड' चित्रपटातून पर्ण पेठे आणि सुमित ही फ्रेश जोडी भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ते दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. नुकतेच या चित्रपटातील  'येडं हे मन माझं...' हे गाणे रिलीज झाले. या गाण्यातील पर्ण पेठे आणि सुमित यांची लव्हेबल केमिस्ट्री ही या गाण्यातील जमेची बाजू आहे. एकीकडे पर्णचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज या गाण्यात पाहायला मिळतो, तर सुमितची शैलीही लक्ष वेधून घेते. हे गाणं म्हणजे या चित्रपटातील नायक-नायिकेच्या बालपणापासून तरुणपणापर्यंतच्या आठवणींचा जणू एक अल्बमच आहे.

पर्ण आणि सुमित या दोघांसोबत हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकार आहेत.या चित्रपटातील गीतांचे लेखन नंदकुमार गोरुले, सुदर्शन खोत, साहिल कुलकर्णी, सुमित, रिषभ पाटील, विशाल सदाफुले यांनी केले आहे. साहिल कुलकर्णी यांनी या गीतांना संगीत दिलं आहे. अभिषेक शेटे आणि जय पारीख यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, स्वप्नील बांदेकर आणि विनायक सुतार यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी ओंकार शेटे यांनी सांभाळली असून, सायली घोरपडे यांनी वेशभूषा केली आहे. सौरभ प्रभुदेसाई यांनी संकलन केलं असून, संदीप गावडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

Web Title: Parn Pethe and Sumit came together for the first time as a fresh couple from the movie 'Vishay Hard'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.