पार्थ भालेराव घेणार फिरकी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2016 08:32 AM2016-07-21T08:32:27+5:302016-07-21T14:07:39+5:30
Exculsive - बेनझीर जमादार बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत भूतनाथ रिटर्न्स या चित्रपटात रूपेरी पडदा गाजवून राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले ...
बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत भूतनाथ रिटर्न्स या चित्रपटात रूपेरी पडदा गाजवून राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरलेला लाडका वंडर किड पार्थ भालेराव आता सगळया प्रेक्षकांची फिरकी घेणार आहे. आश्च़र्य वाटलं ना, घाबरू नका, पार्थ हा कोणाची फिरकी नाही घेणार तर त्याचा नवीन चित्रपटाचे नाव फिरकी आहे. सुनिकेत गांधी दिग्दर्शित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात आपल्याला सर्व बालकलाकार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कहानी मुलांमध्ये होणारी भांडणे घरापर्यत कश्ी पोहोचतात तसेच काही भांडणाचे मोठे स्वरूप कसे होते यावर आधारित असणारा फिरकी हा चित्रपट असल्याचे वंडर किड अभिनेता पार्थ भालेराव याने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगतिले. या चित्रपटात पुष्कर लोणारकर,अथर्व उपासने, अथर्व शाहीग्राम, अभिषेक भराटे हे बालकलाकार म्हणून झळकणार आहेत. तर आश्विनी गिरी, ऋषीकेशा जोशी, ज्योती सुभाष या कलाकारांचा देखील फिरकी या चित्रपटात समावेश आहे. हा चित्रपट आपल्या चिमुरडयांना दिवाळीच्या सुट्टीमध्ये गिफ्टच्या स्वरूपात मिळणार आहे.