'रक्त तोंडावर उडालं आणि मला ते गोड लागलं', प्रार्थना बेहरेनं सांगितला शुटिंगचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 05:49 PM2024-07-30T17:49:52+5:302024-07-30T17:53:11+5:30
पार्थना हिनं ग्लिटर या हिंदी सीरिजच्या शुटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला.
विविध चित्रपट, मालिका यांमधून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) घराघरात पोहोचलेला चेहरा आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. सतत वेगवेगळ्या प्रार्थना बेहरे कारणांमुळे चर्चेत येत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पार्थना हिनं शुटिंगचा एक किस्सा सांगितला. जो सध्या चर्चेत आहे.
पार्थना बेहरेनं नुकतंच मिर्ची मराठीच्या युट्यूब चॅननला मुलाखत दिली. यावेळी पार्थना हिनं ग्लिटर या हिंदी सीरिजच्या शुटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला. एवढं वर्ष, इंडस्ट्रीमध्ये काम करुनही तिला चित्रपटांमध्ये वापरण्यात येणारे रक्त हे कसं असतं, हे माहितीच नसल्याचं तिनं सांगितलं. तिनं चित्रपटांमध्येजे रक्त दाखवलं जातं, ते केमिकलने बनवलेलं असंत आणि त्याची चव ही गोड असते, असं ती म्हणाली.
मुलाखतीमध्ये तिला प्रश्न केला की जेव्हा तुम्ही सुरुवात करत होता, तेव्हा कोणत्या अशा एक दोन गोष्टी होत्या, ज्याबद्दल तुम्हाला अजिबात कल्पनाच नव्हती ? यावर पार्थना म्हणाली की, 'मी एक वेब शो करत होते. ग्लिटर ही सीरिज होती. जी हिंदी होती. मी कधीही जास्त गुन्हेगारी संबंधित कामे केली नव्हती. ग्लिटरसाठी शूट करताना एक सिन होता, ज्यात माझ्यासमोर डेडबॉडी पडली आहे. माझ्या हातात चाकू आणि सगळीकडे रक्त पडलं आहे. ते रक्त माझ्या हाताला आणि ओठाला लागलं. त्याची चव मला गोड लागली. केमिकलने बनवलेलं ते रक्त होतं आणि मला वाटलं की हे छान गोड रक्त आहे. चित्रपटात जे रक्त दिसतं ते गोड असतं', असा किस्सा तिनं सांगितला.