'पाटील' सिनेमाला प्रेक्षक पसंतीचा कौल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 04:31 PM2019-01-02T16:31:34+5:302019-01-02T16:46:35+5:30
प्रेम मिळवण्यासाठीचा संघर्ष आजही पाहायला मिळतो. प्रेमासाठी जेव्हा समाजाची चौकट तोडण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळी संघर्षाला तोंड द्यावेच लागते.
प्रेम मिळवण्यासाठीचा संघर्ष आजही पाहायला मिळतो. प्रेमासाठी जेव्हा समाजाची चौकट तोडण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळी संघर्षाला तोंड द्यावेच लागते. सामाजिक स्थित्यंतरांच्या आजच्या काळातही ही स्थिती बदललेली नाही. अशाच एका प्रेमाची, त्यातील संघर्षाची कथा सांगणाऱ्या ‘पाटील’ चित्रपटाला चित्रपटगृहात रसिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. एका असामान्य जिद्दीची कहाणी सांगणारा ‘पाटील’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. केवळ मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातही या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. २८ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला कोल्हापूर, सांगली, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, नाशिक या शहरात प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून शुक्रवारपासून राज्यात १५० हून अधिक थिएटर्समध्ये प्रदर्शित होत आहे.
आपल्यातील सामाजिक दरीचा विचार न करता कृष्णा आणि पुष्पा एकमेकांच्या प्रेमात पडतात यांच्या नात्यात कोणती वादळं येतात, या वादळानंतर त्यांच्या नात्यात काय बदल होतात, प्रेमाच्या कसोटय़ांवर त्या दोघांचं प्रेम यशस्वी होतं का? हे दाखवताना एका वडिलांची आपल्या मुलासाठीच्या संघर्षाची किनार या चित्रपटाला लाभली आहे. मुलाला प्रोत्साहन देणे व संकटकाळी ठामपणे मुलाच्या पाठीमागे उभे राहणे हे यातून ठळकपणे अधोरेखित झाले आहे. संतोष राममीना मिजगर लिखित-दिग्दर्शित, ‘पाटील संघर्ष... प्रेम आणि अस्तित्वाचा’ चित्रपटात एस.आर.एम एलियन, शिवाजी लोटन पाटील , वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, , यश आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि., साचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि. यांनी ‘या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बॉलीवूड टुरिझम आणि ‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जयशील मिजगर, तेजल शहा, नीता लाड, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे, रुपेश टाक हे चित्रपटाचे निर्माते असून गणेश बीडकर, रामराव वडकुते, संतुकराव हंबर्डे, सौरभ तांडेल, दीपक दलाल, अभिराम सुधीर पाटील सहनिर्माते आहेत. विवेक सिंग कार्यकारी निर्माते आहेत. निलेश गावंड, मनीष शिर्के यांचे संकलन तर छायांकन सुधाकर रेड्डी यकंटी, राजा यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पृथा मांजरेकर, ज्योती मुलगीर यांनी केली आहे. ध्वनी अनिरुद्ध काळे तर व्ही.एफ एक्सची जबाबदारी प्रशांत मेहता, तर कला दिग्दर्शन सुरेश पिल्ले यांचे आहे. आजपासून ‘पाटील’ राज्यातल्या इतर शहरांतूनही धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे.