'लोक इतक्या खालची पातळी गाठतील याचा...', व्हायरल व्हिडीओवर गौतमी पाटीलनं व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 15:00 IST2023-03-06T15:00:02+5:302023-03-06T15:00:51+5:30
सबसे कातिल गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

'लोक इतक्या खालची पातळी गाठतील याचा...', व्हायरल व्हिडीओवर गौतमी पाटीलनं व्यक्त केला संताप
सबसे कातिल गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. गौतमीने आपल्या लावणीनं चाहत्यांना वेड लावले आहे. तिच्या लावणीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते. इतकेच नाही तर सोशल मीडियावरदेखील तिचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान आता तिचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ काढण्यात आले होते. पुण्यामध्ये गौतमी एका कार्यक्रमासाठी आली होती त्यावेळी तिचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ एका व्यक्तीने काढले. हा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडिओवर अनेकांनी नाराजी दर्शवली. दरम्यान आता गौतमीनेदेखील यावर संताप व्यक्त केला आहे.
गौतमी पाटीलचा हा व्हिडीओ व्हायरल होताच रुपाली ताई चाकणकर यांनी सुद्धा दखल घेत पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. यानंतर नाशिक येथे गौतमीचा एक कार्यक्रम पार पडला. यावेळी तिच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी गौतमी पाटील त्या व्हिडिओ बद्दल बोलताना म्हणाली की, ‘आपला व्हिडीओ व्हायरल झाला ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. या गोष्टीवर बोलण्याची माझी मनस्थिती नाही पण तरीही मी इथे आली आहे. लोक माझ्यासोबत आहेत या गोष्टीचा मला अभिमान वाटतो.
ती पुढे म्हणाली की, या लोकांची मला साथ आहे . माझ्याबाबत घडलेल्या गोष्टी बद्दल महिला आयोगाकडे दाद ही गोष्ट मला माहित नव्हती. पण रुपाली ताई चाकणकर यांनी मला साथ दिली. त्यांच्या पुढाकाराने या गोष्टीवर पोलीस कारवाई करतील. महिला आयोग माझ्यासोबत आहे त्याबद्दल खूप बरं वाटतंय मी रुपालीताईंचे आभार मानते’.