समीर वानखेडेंच्या यशामागे या व्यक्तीचा आहे मोलाचा वाटा; क्रांती रेडकरने केला पतीच्या करिअरविषयी मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 12:48 PM2021-10-14T12:48:44+5:302021-10-14T12:49:27+5:30
गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे संचालक समीर वानखेडे चर्चेत आले आहेत.
शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान यांच्या अटकेमुळे आणि मुंबई क्रुझ छापेमारी प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे संचालक समीर वानखेडे चर्चेत आले आहेत. आज समीर यांना अनेक लोक हिरो म्हणून संबोधत आहेत. तर समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने त्यांच्या करिअरच्या प्रत्येक वळणावर त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि त्यांच्या यशात मोलाचा वाटा असणाऱ्या व्यक्तीबद्दल खुलासा एका मुलाखतीत केला आहे.
ईटाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, क्रांती रेडकर हिने मुलाखतीत सांगितले की, समीर योग्य पद्धतीने प्रेशर हाताळू शकतात. समीर अनेक भारतीय ऐतिहासिक नेत्यांच्या विचारांशी जोडले गेलेले आहेत. जगातील अनेक वेगवेगळ्या नेत्यांच्या कथा वाचून ते मोठे झाले आहेत. समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे हे एक पोलीस अधिकारी होते. आता ते निवृत्त झाले आहेत. मात्र जेव्हा पण समीर यांना काही अडचणी असतील किंवा कोणता निर्णय घ्यायचा असेल आणि त्यांना काही कळत नसेल तर ते वेळोवेळी त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन घेतात. त्यांचे वडील त्याच्या करिअरमध्ये समीरला योग्य दिशा दाखवणाऱ्या प्रकाशाप्रमाणे आहेत.
मुंबईमधील सर्वात कडक अधिकारी म्हणून समीर वानखडे यांना ओळखले जाते. २०१३ मध्ये बॉलिवूड सिंगर मिका सिंग याला मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी परदेशी चलनासह पकडले तेव्हा समीर वानखेडे यांनीच त्यांच्यावर कारवाई केली होती. समीर २००४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. त्यांची पहिली पोस्टिंग मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिकारी म्हणून झाली होती. ते आंध्र प्रदेश आणि दिल्लीमध्येही सेवेत होते. समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखील दोन वर्षात सुमारे १७ हजार कोटींचे ड्रग्ज पकडले गेले आहेत. हल्लीच समीर वानखेडे यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.