'त्या' व्यक्तीच्या आठवणीमुळे,सुबोध झाला भावूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 11:38 AM2017-11-03T11:38:32+5:302017-11-03T19:34:55+5:30

रसिकांना आपले आवडते कलाकारांच्या वास्तविक जीवनातील सगळ्या घडामोडी जाणून घेण्याची उत्सुकता असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चाहते आपल्या आवडत्या ...

'That' person's memories, became educated emotion! | 'त्या' व्यक्तीच्या आठवणीमुळे,सुबोध झाला भावूक!

'त्या' व्यक्तीच्या आठवणीमुळे,सुबोध झाला भावूक!

googlenewsNext

/>
रसिकांना आपले आवडते कलाकारांच्या वास्तविक जीवनातील सगळ्या घडामोडी जाणून घेण्याची उत्सुकता असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना अनेक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. सध्या सुबोध भावेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तो कोणाच्यातरी आठवणीने व्याकुळ झाल्याचे पाहायला मिळत आहे.व्हीडिओमध्ये - "हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन, बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन, कावरं बावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही, कोणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही" ही कविता बोलताना भावनिक झालेला सुबोध पाहायला मिळत आहे. इतकेच नाहीतर कवितेच्या अखेरपर्यंत सुबोधचे डोळे पाणावले होते. कवितेचे बोल ऐकुण तुम्हीही भावूक व्हाल असेच आहेत.

हा व्हीडिओ पाहून तुम्हाला वाटले असेल की, हा सुबोधच्या अपकमिंग सिनेमाचे प्रमोशनसाठी शेअर केलेला तो व्हिडीओ असावा.मात्र तसे नसून सुबोधच्या मांडलेल्या त्या भावना एका खास व्यक्तीसाठी आहेत. सुबोध सध्या महिनाभर शूटिंगसाठी बाहेर आहे.यावेळी आपल्या पत्नीची आठवण आल्यानंतर त्याने या कवितेच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. शूटींगदरम्यान हॉटेलरूममधून त्याने हा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओला सुबोधने - "शुटसाठी महिनाभर बाहेर...त्यात मंजिरीची(बायकोची) आठवण... हे कमी म्हणून वैभव जोशीची कविता...चेहऱ्याला रंग लावता येतोच की आम्हाला" ही कॅप्शन दिली आहे. 

शूटिंगनिमित्ताने नेहमीच कलाकारांना आपल्या कुटुंबियांपासून लांब राहावे लागते. आपल्या कुटुंबियांना ते वेळ देऊ शकत नाहीत.त्यामुळे मोठ्या कालावधीसाठी शूटिंगच्या निमित्ताने ते सतत बाहेर असतात त्यामुळे फॅमिलीची कमी त्यावेळी कलाकारांना जाणवणे स्वाभाविक आहे.सुबोध भावेने मांडलेले या भावना फक्त त्याच्याच नसून सर्व कलाकारांची अशीच घालमेल होत असते हेच त्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.आता लवकरच सुबोध भावे एक नाही तर तब्बल 11 सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.11 सिनेमांपैकी काही सिनेमा प्रदर्शित झाले आहेत. तर काही प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.काही सिनेमांच्या शूटिंगला नुकतीच सुरूवात झाली आहे.त्यामुळे आगामी काळातही सुबोध भावे आपल्या रसिकांना मनोरंजनाची ट्रीटच देणार असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Web Title: 'That' person's memories, became educated emotion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.