अरूण गवळीच्या मुलीचा व भावी जावईच्या हळदी व मेहंदी सेरेमनीचा फोटो आला समोर, आज पार पडणार विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 12:17 PM2020-05-08T12:17:43+5:302020-05-08T12:18:08+5:30

लॉकडाउन असतानाही अरूण गवळीच्या मुलीचा आज पार पडणार विवाह

A photo of Arun Gawli's daughter and future son-in-law's turmeric and mehndi ceremony came in front, the wedding will take place today TJL | अरूण गवळीच्या मुलीचा व भावी जावईच्या हळदी व मेहंदी सेरेमनीचा फोटो आला समोर, आज पार पडणार विवाह

अरूण गवळीच्या मुलीचा व भावी जावईच्या हळदी व मेहंदी सेरेमनीचा फोटो आला समोर, आज पार पडणार विवाह

googlenewsNext

कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची कन्या योगिता गवळीसोबत मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अक्षय वाघमारे आज लग्नबेडीत अडकणार आहे. लॉकडाऊनचे नियम पाळत हा विवाह पार पडणार आहे. काल त्यांचा मेहंदी व हळदी समारंभ पार पडला. या सोहळ्याचे फोटो अक्षयने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. खरेतर हे लग्न 29 मार्चला होणार होते मात्र लॉकडाउनमुळे हे लग्न रद्द करावे लागले होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. 

अक्षय आणि योगिता यांचा हळदी समारंभ व मेहंदीचा कार्यक्रम काल कमी लोकांमध्ये दगडी चाळीतच पार पडला आहे.अक्षय लग्नासाठी पुण्यातून पोलिसांची परवानगी घेऊन मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे त्याने हाताला मेहंदी लावल्याचा फोटो शेअर करत पुणे व मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

तसेच त्याने त्याच्या भावी पत्नी योगिता सोबतचा हळदी सेरेमनीचा फोटोदेखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.  

अक्षय व योगिताचे लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच पार पडणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने लग्न होणार आहे. लग्नाला 15 ते 20 नातेवाईकांचीच उपस्थिती असणार आहेत.

लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार आहे. फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबातील सदस्यांनाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी आहे. 

Web Title: A photo of Arun Gawli's daughter and future son-in-law's turmeric and mehndi ceremony came in front, the wedding will take place today TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.