'देव्हाऱ्यात देवाच्या शेजारी विजू मामांची तसबीर', भरत जाधवची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 05:27 PM2022-03-30T17:27:25+5:302022-03-30T17:28:06+5:30

भरत जाधव(Bharat Jadhav)ने नुकतीच विजय चव्हाण (Vijay Chavhan) यांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आली आहे.

'Picture of Viju Mama next to God in the temple', Bharat Jadhav's post in discussion | 'देव्हाऱ्यात देवाच्या शेजारी विजू मामांची तसबीर', भरत जाधवची पोस्ट चर्चेत

'देव्हाऱ्यात देवाच्या शेजारी विजू मामांची तसबीर', भरत जाधवची पोस्ट चर्चेत

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्य आणि विनोदाचे अचूक टायमिंग साधून अभिनेता भरत जाधव(Bharat Jadhav)ने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. जत्रा, खबरदार, पछाडलेला यासारख्या चित्रपटातून त्यांची विनोदी भूमिका असो वा बकुळा नामदेव घोटाळे चित्रपटातला त्यांनी साकारलेला खलनायक. या सर्वच भूमिका त्यांनी अगदी चोख बजावल्या आहेत. आपल्या आयुष्याच्या या यशस्वी प्रवासात ते नेहमीच आपल्या आई वडिलांना, मित्रांना आणि सहकलाकारांना यशाचे श्रेय देतात. मात्र आणखी एक असे अभिनेते आहेत ज्यांचे भरत जाधव मनापासून आभार मानतो. हे अभिनेते म्हणजे विजय चव्हाण (Vijay Chavhan).

दिवंगत अभिनेते विजय चव्हाण आणि भरत जाधव यांनी मुंबईचा डबेवाला, जत्रा, पछाडलेला अशा अनेक चित्रपट आणि नाटकात एकत्र काम केले आहे. त्यामुळे विजय चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन भरत जाधव यांना नेहमी मिळाले आहे. भरत जाधवने नुकतीच विजय चव्हाण यांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आली आहे.


भरत जाधवने इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिले की, आचार्य अत्रे लिखित सुपरहिट नाटक 'मोरूची मावशी' चा पहिला प्रयोग १ मे १९६३ रोजी महाराष्ट्र दिनी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात पार पडला. त्यावेळी त्यात मावशीची भूमिका साकारली होती बापूराव माने यांनी. काही वर्षानंतर हेच नाटक नव्या संचात करायचं ठरलं आणि मावशीच्या भूमिकेसाठी विचारणा झाली सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांना पण त्यांनी नाव सुचवलं ते विजय चव्हाण यांचं. आणि विजू मामांनी त्या भूमिकेचं सोनं केलं. विजू मामा अक्षरशः ती भूमिका जगले. मावशी साकारावी तर ती विजू मामांनीच.

हे मी माझं भाग्य समजतो... - भरत जाधव
त्याने या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, विजू मामांनंतर मावशी साकारायची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. मोरूची मावशीसाठी जेव्हा मला विचारणा करण्यात आली तेव्हा पहिला फोन विजू मामांना केला होता, की मी करू का... ते म्हणाले तूच कर..!! आजही मोरूची मावशीचा जिथे कुठे प्रयोग असेल तिथे देव्हाऱ्यात देवाच्या शेजारी विजू मामांची ही तसबीर असते.

Web Title: 'Picture of Viju Mama next to God in the temple', Bharat Jadhav's post in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.