लग्नानंतर पहिल्यांदाच पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणने एकमेकांसाठी घेतले हटके उखाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 12:53 PM2024-02-29T12:53:12+5:302024-02-29T12:54:02+5:30

लग्नानंतर पहिल्यांदाच पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांनी एकमेकांसाठी हटके उखाणे घेतले.

Pooja Sawant And Siddhesh Chavan Took Special Ukhana After Marriage Video Viral | लग्नानंतर पहिल्यांदाच पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणने एकमेकांसाठी घेतले हटके उखाणे

लग्नानंतर पहिल्यांदाच पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणने एकमेकांसाठी घेतले हटके उखाणे

अभिनेत्री पूजा सावतंच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्री पूजा सावंत  (pooja sawant) आणि सिद्धेश चव्हाण (siddhesh chavan) यांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला आहे  सध्या सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदाच पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणने एकमेकांसाठी घेतले हटके उखाणे घेतला. या उखाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

लग्नानंतर  पूजा आणि सिद्धेशने माध्यमांसमोर आले. यावेळी पुजा  लाल रंगाची साडी, हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने अशा लूकमध्ये दिसली. तर सिद्धेशने रवानी परिधान केली होती. माध्यमांसमोर जोडीने खास उखाणे देखील घेतले. 'ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात जीवनाची नौका, पूजाचं नाव घेतो सर्वजण ऐका', असा उखाना सिद्धेशने घेतला. तर पुजा उखाणा घेत म्हणाली, "सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, सिद्धेश रावांचं नाव घेते सात जन्मांसाठी". पूजा आणि सिद्धेशचा उखाणा ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं. नेटकऱ्यांनी सुद्धा या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 पूजा सावंतवर आज मराठी कलाविश्वासह तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. या दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. पूजाच्या लग्नविधींचे फोटो पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सिद्धेश सध्या ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असून पूजाही काही काळासाठी त्याच्यासोबत तिकडे शिफ्ट होणार आहे.
 

Web Title: Pooja Sawant And Siddhesh Chavan Took Special Ukhana After Marriage Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.