अभिनेत्री पूजा सावंतला फॅन्सकडून दिवाळी गिफ्ट, इन्स्टाग्रामवर पार केला १० लाख फॉलोअर्सचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 14:45 IST2018-11-05T14:43:38+5:302018-11-05T14:45:59+5:30
फॅन्सकडून प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला मिळणारं प्रेम हे विशेष तसंच तितकंच खास असतं. ते मिळत असल्यानं स्वतःला नशीबवान समजत आहे अशा शब्दांत पूजा सावंतने आपल्या सर्व फॅन्सचे आभार मानले आहेत.

अभिनेत्री पूजा सावंतला फॅन्सकडून दिवाळी गिफ्ट, इन्स्टाग्रामवर पार केला १० लाख फॉलोअर्सचा टप्पा
आपल्या अभिनयाने तसंच सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. दिवसेंदिवस तिच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होत आहे. तिच्या याच फॅन्सनी तिला दिवाळीचं तिच्या रसिकांनी गिफ्ट दिले आहे. सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर पूजाने १० लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. यामुळे पूजा भलतीच खूश असून तिने आपला आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
फॅन्सकडून प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला मिळणारं प्रेम हे विशेष तसंच तितकंच खास असतं. ते मिळत असल्यानं स्वतःला नशीबवान समजत आहे अशा शब्दांत तिने आपल्या सर्व फॅन्सचे आभार मानले आहेत. याच प्रेमामुळेच आनंदी, हसतमुख असून मिळणारं सगळं यश हे फॅन्सचे असल्याचे तिने नमूद केले आहे. पूजा सावंतने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.