महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 12:41 PM2024-05-01T12:41:53+5:302024-05-01T12:43:24+5:30

पूजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले...

Pooja Sawant s special post on the occasion of Maharashtra Day placed Idol of Chhatrapati Shivaji Maharaj in Australia s home | महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

मराठी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) फेब्रुवारी महिन्यात लग्नबंधनात अडकली. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या सिद्धेश चव्हाणसोबत तिचं लग्न झालं. लग्नानंतर पूजा सिद्धेशसोबत ऑस्ट्रेलियाला गेली आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त पूजाने एक खास पोस्ट शेअर केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांना अभिमान वाटेल अशी तिची पोस्ट आहे.

पूजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले, "सर्वांना महाराष्ट्रदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. माझी खुप इच्छा होती कि मुंबईत असलेल्या घराप्रमाणेच, माझ्या ॲास्ट्रेलियाच्या घरात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा असावी. लग्नापूर्वी ही इच्छा मी माझ्या टीमला अगदी सहजपणे बोलून दाखवली होती. त्यातील मनोजने (आमचे spot दादा )ही प्रतिमा मला आमच्या लग्नात भेट म्हणून दिली. आणि त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने मी महाराजांची ही प्रतिमा ऑस्ट्रेलियाला आणली. अखेर आता छत्रपती शिवाजी महाराज आमच्या ऑस्ट्रेलियाच्या घरात सुद्धा विराजमान झाले आहेत. खूप खूप धन्यवाद मनोज."

पूजाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. 'जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपली संस्कृती विसरायची नाही याचं उत्तम उदाहरण' अशी कमेंट एका चाहत्याने कली आहे.  पूजाचा लग्नाआधी 'मुसाफिरा' हा शेवटचा सिनेमा रिलीज झाला. यानंतर ती लग्नव करुन ऑस्ट्रेलियाला गेली. आता पूजा कधी कमबॅक करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

 

Web Title: Pooja Sawant s special post on the occasion of Maharashtra Day placed Idol of Chhatrapati Shivaji Maharaj in Australia s home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.