एथनिक ड्रेसमध्ये पूजा सावंतने शेअर केले फोटोशूट, चाहते झाले फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 18:54 IST2020-11-09T18:30:00+5:302020-11-09T18:54:29+5:30
क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.

एथनिक ड्रेसमध्ये पूजा सावंतने शेअर केले फोटोशूट, चाहते झाले फिदा
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. त्याचसोबत आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर पूजाने ड्रेसमधले फोटो शेअर केला आहे. ट्रेडिशनल लूकमध्ये पूजा सुंदर दिसते आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच पूजा 'दगडी चाळ 2'मध्ये दिसणार आहे.
पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती.