लेकीसह प्रणव रावराणने फॉलो केला मधुमास ट्रेंड; पाहा बापलेकीचा भन्नाट व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 18:45 IST2023-04-06T18:45:00+5:302023-04-06T18:45:00+5:30
Pranav Raorane: प्रणवच्या लेकीने अगदी परफेक्ट पद्धतीने या गाण्यातील डान्स स्टेप फॉलो केल्या आहेत. त्यामुळे या चिमुकलीचा डान्स नेटकऱ्यांना विशेष भावत आहे

लेकीसह प्रणव रावराणने फॉलो केला मधुमास ट्रेंड; पाहा बापलेकीचा भन्नाट व्हिडीओ
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मधुमास ट्रेंड व्हायरल होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी बहरला हा मधुमास नवा या गाण्यावर भन्नाट रिल्स केले आहेत. यामध्येच मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्यालादेखील हा ट्रेंड फॉलो करण्याचा मोह आवरला नाही. या अभिनेत्याने चक्क आपल्या चिमुकल्या लेकीसह ट्रेंड फॉलो केला.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रणव रावराणे (Pranav Raorane) याने 'बहरला हा मधुमास' नवा या ट्रेंडी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. इतकंच नाही तर त्याच्या लहानग्या लेकीनेही त्याला यात साथ दिली आहे. हा व्हिडीओ प्रणवची पत्नी, अभिनेत्री अमृता रावराणे हिने शेअर केला असून प्रणवला टॅग केलं आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये प्रणवच्या लेकीने नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे.
दरम्यान, प्रणवच्या लेकीने अगदी परफेक्ट पद्धतीने या गाण्यातील डान्स स्टेप फॉलो केल्या आहेत. त्यामुळे या चिमुकलीचा डान्स नेटकऱ्यांना विशेष भावत आहे. केदार शिंदे यांच्या महाराष्ट्र शाहीर या सिनेमातलं हे गाणं असून सध्या तुफान व्हायरल झालं आहे. आतापर्यंत या गाण्यावर मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी ताल धरला आहे.