लोकप्रिय मराठी जोडप्यानं १२-१५ वर्ष कष्ट करून बांधलं स्वप्नातलं फार्महाऊस, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:54 IST2025-04-20T12:54:15+5:302025-04-20T12:54:49+5:30

सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी जोडप्यानं कष्टानं उभारलेल्या आपल्या फार्महाऊसची झलक दाखवली आहे.

Popular Marathi Couple Madhugandha Kulkarni Paresh Mokashi's Hiranya Farmhouse Near Mumbai Shared Video | लोकप्रिय मराठी जोडप्यानं १२-१५ वर्ष कष्ट करून बांधलं स्वप्नातलं फार्महाऊस, पाहा व्हिडीओ

लोकप्रिय मराठी जोडप्यानं १२-१५ वर्ष कष्ट करून बांधलं स्वप्नातलं फार्महाऊस, पाहा व्हिडीओ

Madhugandha Kulkarni Paresh Mokashi Farmhouse: मराठी कलाकार त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा लक्ष वेधून घेत असतात. अनेक मराठी कलाकारांनी स्वतःचा व्यवसाय  सुरू केला तर काहींनी स्वतःचं फार्महाऊस खरेदी केलं.  प्राजक्ता माळीने कर्जतला तर मेघा धाडेने कोकणात स्वतःचं फार्महा ऊस सुरू केलं. प्रदीप कबरे यांचं मनोरी या गावात तर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सोनाळे या गावात अतुल कुलकर्णी यांचं फार्महाउस आहे. आता लोकप्रिय दिग्दर्शक परेश मोकाशी आणि अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी या लोकप्रिय जोडप्यानं आपल्या फार्महाऊसची झलक दाखवली आहे. 

परेश आणि  मधुगंधा यांनी १२ ते १५ वर्ष कष्ट करून हे फार्महाऊस बांधलं आहे.  वाडा येथे ३ एकरांवर हे फार्महाऊस पसरलं आहे. मधुगंधानं फार्महाऊसचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं, "फ… फ… फार्मचा…जन्माने शेतकरी, वृत्तीने वारकरी आणि कर्माने फिल्मकरी…माझा विठ्ठल माझा निसर्ग आहे. त्याच्या जवळ जाण्याचा थोडा प्रयत्न. शेती, झाडं , जमिनीवरचं घर सत्यात उतरतं तो अनुभव घेणं आणि तो जगणं…हे माझ्या या सीरिज मधून मी शेअर करतेय…आशा आहे तुम्हा सगळ्यांना आवडेल…तुमचा अभिप्राय नक्की कळवा…निसर्गाचा विजय असो". 

व्हिडीओमध्ये मधुगंधा म्हणते की, "मी आणि परेश आम्ही दोघेही शेतकरी. आमच्या फार्महाऊसचं नावं 'हिरण्य' आहे. हिरण्य म्हणजे सोनं! आमच्यासाठी हे फार्महाऊस सोन्या इतकंच अमुल्य आहे. कारण हे मिळवण्यासाठी आम्हाला १२ ते १५ वर्ष कष्ट करावी लागली आहेत. एक वैराण जमीन विकत घेतली. त्याच्यावर घर बांधलं आणि त्याच्या आजूबाजूला वन उभं करू या, असं आम्ही स्वप्न बघितलं. त्यामुळे दरवर्षी आम्ही थोडी थोडी झाडं लावून आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करत आहोत. फार्महाऊसचा आनंद काय आहे माहिती आहे का, इथे आपण जागे होतो पक्ष्यांच्या किलबिलांटांनी. हे सुख शहरात मिळत नाही".


"आज सकाळी मी उठले, तर इकडंची पोरं धावत आली. त्यांच्याबरोबर थोडीशी खेळले, मस्ती केली. थोडं झाडांना पाणी घातलं. पण आज माझं दुसरं टार्गेट आहे, ते म्हणजे विहीर स्वच्छ करणं. मी स्वतः विहिरीत उतरले. म्हटलं, बघू तरी किती कष्ट विहीर स्वच्छ करायला पडतात. हेच इकडंचं जीम आहे बरं का. थोडी विहीर मी स्वच्छ केली. थोडी आमच्या नारायण भाऊंनी केली आणि आज घरामध्ये स्वच्छ केलेल्या विहिरीतलं पाणी येणार आहे. त्याच्यानंतर सुरू होतं, पावसाळ्यापूर्वीचं प्लॅनिंग…कुठली झाडं लावायची आहेत, किती खड्डे करायचे आहेत, रोपं कुठून आणायची, वन करायचं म्हणजे हे सगळं प्लॅनिंग करावंच लागणार ना. बाकी सगळं पुढच्या व्हिडीओमध्ये", असं म्हणताच व्हिडीओ संपला. मधुगंधाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट या जोडीचं कौतुक केलं आहे. 
 

Web Title: Popular Marathi Couple Madhugandha Kulkarni Paresh Mokashi's Hiranya Farmhouse Near Mumbai Shared Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.