गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये 'विजेता' चित्रपटाचे पोस्टर लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 14:40 IST2019-06-29T14:38:47+5:302019-06-29T14:40:23+5:30
येत्या आँगस्ट महिन्यापासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू होत असून पुढील वर्षी 24 जानेवारीला प्रदर्शित करण्याचा सुभाष घईंचा विचार आहे.

गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये 'विजेता' चित्रपटाचे पोस्टर लॉन्च
हिन्दी चित्रपटसृष्ट्रीत शोमन म्हणून प्रख्यात असलेल्या सुभाष घई यांनी त्यांच्या ,मुक्ता आर्टस् लि तर्फे 'सन ई चौघडे' 'वळू' आणि 'समिता' या तीन मराठी चित्रपटांची निर्मिती केली होती. समिता या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. आता सुभाष घई त्यांच्या मुक्ता आर्टस् लि. 'विजेता' या नव्या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. गोवा येथे सुरु असलेल्या मराठी चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च करण्यात आले.
खेळाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट पोस्टरवरूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणारा आहे हे लक्षांत येत. येत्या आँगस्ट महिन्यापासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू होत असून पुढील वर्षी 24 जानेवारीला प्रदर्शित करण्याचा सुभाष घईंचा विचार आहे. या चित्रपटाचे लेखक,दिग्दर्शक अमोल शेटगे आहेत. या चित्रपटात सुबोध भावे,पुजा सावंत,नेहा महाजन,पुजा बिश्त,माधव देवक्के,देवेन्द्र चौगुले,गौरीश शिपुरकर,सुशांत शेलार,मानसी कुलकर्णी,क्रुतिका तुलसकर,ललित सावंत आणि दिप्ती धोत्रे या कलावंतांचा समावेश आहे.