नटसम्राट नाटकाचे पोस्टर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 19:49 IST2018-10-25T19:46:07+5:302018-10-25T19:49:00+5:30
शेक्सपियरच्या गाजलेल्या शोकांतिकांपासून प्रेरित होऊन वि.वा.शिरवाडकर यांनी सत्तरच्या दशकात नटसम्राट हे नाटक रंगभूमीवर आणलेले हे नाटक पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहे.

नटसम्राट नाटकाचे पोस्टर आऊट
कुणी घर देता का घर? हे वाक्य पुन्हा एकदा आपल्याला रंगमंचावर ऐकावयास मिळणार आहे. शेक्सपियरच्या गाजलेल्या शोकांतिकांपासून प्रेरित होऊन वि.वा.शिरवाडकर यांनी सत्तरच्या दशकात नटसम्राट हे नाटक रंगभूमीवर आणलेले हे नाटक पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहे. या नाटकातल्या गणपतराव म्हणजेच आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तीरेखा नाट्यरसिकांना भावली होती. ही व्यक्तिरेखा नाना पाटेकर यांनी साकारली होती. आता ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी साकारणार आहेत.
नुकताच या नाटकाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. नटसम्राट 4 नोव्हेंबरपासून रंगमंचावर येणार आहे. नाटकातील कावेरीच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी असतील. बऱ्याच वर्षांनी हे दोघं रंगभूमीवर आले असून ऋषीकेश जोशी या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत.आजवर विविध दिग्गज कलाकारांनी गणपतराव बेलवलकर ही भूमिका रंगभूमीवर गाजवली आहे. त्यांच्याप्रमाणेच मोहन जोशीसुद्धा या भूमिकेला न्याय देतील असा विश्वास रंगकर्मी आणि नाट्यरसिकांना आहे.
या नाटकाने रंगभूमीवर इतिहास रचला होता. प्रत्येक मराठी रसिकाच्या मनावर या नाटकाचं गारूड आजही कायम आहे. याच नाटकावर आधारित नटसम्राट हा सिनेमाही रूपेरी पडद्यावर प्रचंड लोकप्रिय ठरला. या नाटकात नाना पाटेकर यांनी साकारलेली आप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका रसिकांच्या काळजात घर करून गेली. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा या नाटक पाहण्यासाठी आतुर असतील यात काही शंका नाही.