Pradeep Patwardhan: 'मोरुच्या मावशी'ची तिकिटं तो ब्लॅकमध्ये विकायचा', विजय पाटकरांनी सांगितलेला प्रदीप पटवर्धनांचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 11:25 AM2022-08-09T11:25:31+5:302022-08-09T11:25:54+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच एक हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Pradeep Patwardhan: 'He used to sell tickets to 'Morucha Mavashi' in black', Pradeep Patwardhan's anecdote told by Vijay Patkar | Pradeep Patwardhan: 'मोरुच्या मावशी'ची तिकिटं तो ब्लॅकमध्ये विकायचा', विजय पाटकरांनी सांगितलेला प्रदीप पटवर्धनांचा किस्सा

Pradeep Patwardhan: 'मोरुच्या मावशी'ची तिकिटं तो ब्लॅकमध्ये विकायचा', विजय पाटकरांनी सांगितलेला प्रदीप पटवर्धनांचा किस्सा

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचं निधन झालं आहे. प्रदीप पटवर्धन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच एक हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. प्रदीप पटवर्धन यांची मोरूची मावशी या नाटकातील भूमिका अतिशय गाजली होती. या भूमिकेने प्रत्येकाच्या मनात घर केले होते. प्रदीप पटवर्धन यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट, नाटक, मालिका केल्या. नाटकात काम करतानाचा प्रदीप यांचा एक किस्सा अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमात सांगितला गेला होता.

प्रदीप पटवर्धन यांचे जवळचे मित्र विजय पाटकर यांनी हा किस्सा सांगितला होता. मोरुची मावशी नाटक यशाच्या शिखरावर असताना प्रदीप पटवर्धन नाटकांची तिकिटे ब्लॅकमध्ये विकायचे असे ते म्हणाले होते. हे ऐकल्यावर प्रदीप यांचा चेहरा फारच केविलवाणा झाला होता. विजय पाटकरांनी पुढे सांगितले की, प्रदीप निर्माते सुधीर भटांकडून काही तिकिटं घ्यायचा आणि नंतर ती ब्लॅकमध्ये विकायचा. नाटकाची नाईट नी त्यावर हे वरचे पैसे, कुठल्या नटाला हे सुचेल सांगा.' 
विजय पाटकरांचे म्हणणे ऐकल्यावर प्रदीप पटवर्धन यांनीही आपली बाजू सावरली होती. 'मी कशाला तिकिटं ब्लॅक करीन, चांगली नोकरी करत होतो मी. माझ्या एण्ट्रीने मोरुची मावशी नाटक सुरू व्हायचे. तर मी तिथे एन्ट्री घेऊ की खाली तिकिटं ब्लॅकमध्ये विकत बसू,' असं सांगत पाटकर चेष्ठा करत असल्याचं सांगितले.

Web Title: Pradeep Patwardhan: 'He used to sell tickets to 'Morucha Mavashi' in black', Pradeep Patwardhan's anecdote told by Vijay Patkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.