प्राजक्ता माळीनं केला धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'ब्रेकअपमुळे माझं...'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:21 PM2022-06-15T12:21:16+5:302022-06-15T12:21:42+5:30
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच ब्रेकअपबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali)ची बहुचर्चित वेबसीरिज 'रानबाजार' (RaanBaazar) नुकतीच रिलीज झाली. या वेबसीरिजला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. तसेच प्राजक्ताच्या कामाचे देखील खूप कौतुक झाले. या सीरिजमुळे प्राजक्ता माळी सतत चर्चेत येत होती.आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिने तिच्या रिलेशनशीपबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
प्राजक्ता माळी लवकरच वाय या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचे ब्रेकअप झाल्याचे नुकतेच तिने एका मुलाखतीत सांगितले.
ती म्हणाली की, वाय चित्रपट शूट होत होता त्यावेळेला माझं ब्रेअकप झालं होतं. मी कुठं होते माझं काय चाललंय ह्या गोष्टीसुद्धा मला नीट आठवत नव्हत्या. हा चित्रपट जेव्हा शूट करत होतो तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक मला आठवण करून देत होते की तू हा सीन करत असताना पडली होती आणि तू ह्या सीनला असं बोलली होती तुला आठवतंय? असे विचारल्यावर मी फक्त हो म्हणत होते.
प्राजक्ता माळी विविधांगी भूमिका साकारताना दिसते आहे. याबद्दल ती सांगते की, एक कोणीतरी हिरोईन असं म्हणून मला मरायचं नाहीये. अजून खूप काही बाकी आहे. ते सगळे प्रोजेक्ट्स माझ्यापर्यंत यावेत अशी मी देवाकडे प्रार्थना करते. काळानुरूप हे बदल होत आहेत. मराठी सिनेइंडस्ट्रीचं चित्र बदलतंय त्यामुळे ही एक तगडी स्पर्धा आहे सगळ्यांसाठी.