प्राजक्ता माळीने शेअर केला तिच्या चार पिढ्यांचा खास फोटो, सांगितली आजोळच्या यात्रेची रंजक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:53 IST2025-04-15T12:53:31+5:302025-04-15T12:53:52+5:30

शूटिंगमधून वेळात वेळ काढून प्राजक्ता आजोळच्या यात्रेत सहभागी झाली होती. त्यानिमित्त प्राजक्ताने खास किस्सा सांगितला (prajakta mali)

Prajakta Mali shared a special photo of her four generations at pandharpur tuljapur yatra | प्राजक्ता माळीने शेअर केला तिच्या चार पिढ्यांचा खास फोटो, सांगितली आजोळच्या यात्रेची रंजक कहाणी

प्राजक्ता माळीने शेअर केला तिच्या चार पिढ्यांचा खास फोटो, सांगितली आजोळच्या यात्रेची रंजक कहाणी

प्राजक्ता माळी (prajakta mali) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय. प्राजक्ता माळी सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं (maharashtrachi hasyajatra) सूत्रसंचालन करतेय. याशिवाय २०२४ ला प्राजक्ताची प्रमुख भूमिका असलेला 'फुलवंती' सिनेमा चांगलाच गाजला. प्राजक्ता सोशल मीडियावर तिच्या कुटुंबासंबंधी आठवणी शेअर करत असते. अशातच प्राजक्ता तिच्या आजोळी यात्रेनिमित्त गेली होती. यावेळी प्राजक्ताच्या चार पिढ्या एकत्र आलेल्या दिसल्या.

प्राजक्ता माळीने यानिमित्त सोशल मीडियावर फोटो शेअर करुन लिहिलंय की, "गावची कावड. नायकाची भाळवणी- पंढरपूर- कावडीमागची गोष्ट - शिंदे - लोखंडे - जीवाभावाचे मित्र. लोखंडेंनी शिखरशिंगणापूरला राजाकडून मान- निशाणी मिळवण्यासाठी दांडपट्ट्यामध्ये जिंकून तो मिळविण्याचा पण केला. ते जिंकले, मान मिळाला पण दांडपट्टा खेळत असता लोखंडेंची प्राणज्योत मालवली, मैत्रीत खंड पडला."


"शेवटच्या घटका मोजत त्यांनी शिंदेकडून वचन घेतलं, “जोवर आकाशात चंद्र- सूर्य आहेत तोवर आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून शिंदे- लोखंडे अशा दोन्ही कावडी एकत्र शिखरशिंगणापूरला जातील. त्यात खंड पडणार नाही. आणि तोवर मानाप्रमाणे दोन्हीं कावडींच्या पताकांची नक्कल कोणीही करू शकणार नाही.” गेल्या कित्येक पिढ्यांपासून भाळवणीकर दोन मित्रांचं हे वचन प्राणपणानं जपतात. आजही जेव्हा कावडी शिखरशिंगणापूरला जातात भाळवणी निर्मनुष्य होते.  त्यामिमित्ताने चार पिढ्या एकत्र आल्या. लेकरांना कोकरं - पिल्लं भेटली... श्री क्षेत्र तुळजापूर. आई तुळजाभवानी " अशाप्रकारे प्राजक्ताने तिच्या आजोळच्या यात्रेमागचा खास किस्सा सर्वांना सांगितला आहे.

Web Title: Prajakta Mali shared a special photo of her four generations at pandharpur tuljapur yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.