"मराठ्यांच्या राजाची..." विकी कौशलचा 'छावा' सिनेमा पाहून प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 13:59 IST2025-02-16T13:59:48+5:302025-02-16T13:59:59+5:30
अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही छावा' पाहून खास प्रतिक्रिया दिली आहे.

"मराठ्यांच्या राजाची..." विकी कौशलचा 'छावा' सिनेमा पाहून प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया
Prajakta Mali: लक्ष्मण उतेकर (Director Laxman Utekar) दिग्दर्शित 'छावा' हा सिनेमा शुक्रवारी म्हणजेच 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. 'छावा' चित्रपटाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरातील सिनेप्रेमींना छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) व अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), अक्षय खन्ना (Akshaye Khanna) यांच्या मुख्य भूमिका असलेला या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही छावा' पाहून खास प्रतिक्रिया दिली आहे.
प्राजक्ता माळीने काल 'छावा' चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर तो कसा वाटला, याबद्दल तिनं पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्तानं लिहलं, "छत्रपती संभाजी महाराज की जय! मराठ्यांच्या राजाची, मराठी बाण्याची, सिंहाच्या छाव्याची गोष्ट जगभरात पोहोचवली त्याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, दिनेश विजन आणि 'मॅडडॉक फिल्म'चे मनापासून आभार… काल 'छावा' चित्रपट पाहिला… अश्रू अनावर झाले, चित्रपट नक्की बघाठ, असं तिनं म्हटलं.
'छावा'ने बॉलिवूडला २०२५ वर्षाची दमदार सुरुवात करून दिली आहे. तर विकीसाठी 'छावा' हा त्याच्या आजवरच्या सिनेमांपैकी सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. १३० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशीच तब्बल ३१ कोटींचा गल्ला जमवला होता. तर आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या शनिवारी सिनेमाने ३६.५ कोटींची कमाई केली आहे. रविवारी सिनेमाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. तर पहिल्या विकेंडला 'छावा' सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करण्याचा अंदाज वर्तविला आहे. या मल्टिस्टारर चित्रपटात अनेक मराठी कलाकार देखील झळकले आहेत. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, किरण करमरकर तसेच दमयंती पाटकर असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत.