प्रमोद पवारांची'ट्रकभर स्वप्नं’अवतरणार प्रत्यक्षात !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 04:14 PM2018-08-23T16:14:11+5:302018-08-23T16:24:29+5:30

क्रांती रेडकरसोबत यापूर्वी काम केलं असल्याने तिच्याबाबत ठाऊक होतंच. इतर कलाकारांनाही त्यांच्या योग्यतेप्रमाणे भूमिका दिल्या आणि प्रत्येकाने त्या अगदी मन लावून साकारल्या आहेत.

Pramod Pawar's 'dream dream' will actually be! | प्रमोद पवारांची'ट्रकभर स्वप्नं’अवतरणार प्रत्यक्षात !

प्रमोद पवारांची'ट्रकभर स्वप्नं’अवतरणार प्रत्यक्षात !

googlenewsNext

‘आपणही एकदा चित्रपटाचं दिग्दर्शन करायचं’ असं बऱ्याच कलाकारांच्या मनात असतं, पण योग्य वेळ आल्याशिवाय काहीच घडत नसतं. रंगभूमीसोबतच सिनेसृष्टीतही अभिनयाच्या माध्यमातून मुशाफिरी करणारे अभिनेते प्रमोद पवार यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. आजवर बऱ्याच नाटकांमधून तसेच सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या प्रमोद पवार यांची पावलं चित्रपट दिग्दर्शनाकडे वळली आहेत. विजया मेहता आणि राजदत्त यांच्यासारख्या दिग्गजांसोबत सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या प्रमोद यांनी आजवर वेगवेगळ्या प्रकारची नाटके दिग्दर्शित केली आहेत. प्रभात काळातले महत्त्वाचे दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांच्या तालमीत तयार झालेल्या प्रमोद पवारांचं चित्रपट दिग्दर्शक बनण्याचं ‘ट्रकभर स्वप्नं’ साकार झालं आहे. येत्या २४ ऑगस्टला त्यांचा ‘ट्रकभर स्वप्नं’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

अभिनय करता करता दिग्दर्शनाकडे वळणाऱ्या कलाकारांची संख्या फार मोठी आहे. प्रमोद पवारही आता या कलाकारांच्या पंक्तीत विराजमान झाले आहेत. करियरच्या या वळणावर दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेण्याबाबत पवार म्हणाले की, दिग्दर्शन करण्याची इच्छा पूर्वीपासून होती, पण योग्य वेळ जुळून येत नव्हती. ‘ट्रकभर स्वप्नं’या सिनेमाची कथा मनाला भावली आणि दिग्दर्शनाकडे वळण्याचा निर्णय पक्का झाला. यासाठी मग सर्वच गोष्टी आपोआप जुळत गेल्या. या सिनेमाच्या निमित्ताने एक संगीतप्रधान मनोरंजक सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केल्याचं पवार म्हणतात.

या सिनेमात प्रमोद पवार यांनी वास्तव परिस्थितीची सर्वसामान्यांच्या स्वप्नांशी सांगड घातली आहे. सिनेमाच्या कथानकाबाबत आणि कलाकारांबाबत प्रमोद पवार म्हणाले की, हा सिनेमा जसं माझं स्वप्नं सत्यात उतरवणारा आहे, तसाच प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या स्वप्नांना आशेचे पंख जोडणाराही आहे. यातील टॅक्सी ड्रायव्हरच्या मुख्य भूमिकेसाठी मला एका अशा कलाकाराची गरज होती, जो काहीसा लहरी, पण दर्जेदार अभिनय करणारा असेल. मकरंद देशपांडेने आजवर सर्वच भूमिका सजीव केल्या आहेत. त्याच्या अभिनयात एक सणक आहे, जी या सिनेमातील भूमिकेसाठी पूरक वाटली. क्रांती रेडकरसोबत यापूर्वी काम केलं असल्याने तिच्याबाबत ठाऊक होतंच. इतर कलाकारांनाही त्यांच्या योग्यतेप्रमाणे भूमिका दिल्या आणि प्रत्येकाने त्या अगदी मन लावून साकारल्या आहेत.

‘ट्रकभर स्वप्नं’ या सिनेमाची पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिले आहेत. आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा. लि यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती मीना चंद्रकांत देसाई आणि नयना देसाई यांनी केली आहे. या सिनेमात मुकेश ऋषी, मनोज जोशी, स्मिता तांबे, आदिती पोहनकर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. २४ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे निर्मीती सल्लागार संजय खानविलकर आहेत.

Web Title: Pramod Pawar's 'dream dream' will actually be!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.