​दिमाखात रंगला ‘घाट’ चित्रपटाचा प्रिमीअर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 05:11 AM2017-12-18T05:11:21+5:302017-12-18T10:41:21+5:30

संवेदनशील कथानक आणि उत्तम निर्मितीमूल्य असलेल्या ‘घाट’ चित्रपटाचा दिमाखदार प्रिमीअर नुकताच मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात संपन्न झाला. ‘घाट’ चित्रपटाच्या माध्यमातून ...

Pramyare of the movie 'Ghat' in Rang Deel | ​दिमाखात रंगला ‘घाट’ चित्रपटाचा प्रिमीअर

​दिमाखात रंगला ‘घाट’ चित्रपटाचा प्रिमीअर

googlenewsNext
वेदनशील कथानक आणि उत्तम निर्मितीमूल्य असलेल्या ‘घाट’ चित्रपटाचा दिमाखदार प्रिमीअर नुकताच मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात संपन्न झाला. ‘घाट’ चित्रपटाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांच्या जगण्यातील वास्तव पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याची भावना व्यक्त करताना दिग्दर्शक राज गोरडे यांनी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्या सचिन जरे यांचे आभार यावेळी व्यक्त केले. ‘सामाजिक भान जपणाऱ्या कलाकृती समाजासमोर आवर्जून यायला हव्यात या उद्देशाने घाट च्या निर्मिती साठी पुढाकार घेतल्याचे निर्माते सचिन जरे यांनी याप्रसंगी सांगितले. चांगल्या कलाकृतीचा भाग होता आल्याचा आनंद संगीतकार रोहित नागभिडे यांनी व्यक्त केला. तर हा चित्रपट प्रत्येकाला नक्की विचार करायला भाग पाडेल असं मत अभिनेता उमेश जगताप यांनी बोलून दाखवलं.   

या चित्रपटाची कथा- पटकथा- संवाद राज गोरडे यांचे आहेत. यश कुलकर्णी व दत्तात्रय धर्मे या दोन लहान मुलांसह मिताली जगताप, उमेश जगताप, रिया गवळी यांच्याही ‘घाट’ मध्ये भूमिका आहेत. अमोल गोळे यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं आहे. रोहित नागभिडे यांनी या चित्रपटाला संगीत दिलं असून, राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या महावीर साबन्नवार यांनी साऊंड डिझाइनिंगचं काम पाहिलं आहे. चित्रपटातील ज्ञानोबा माऊलीचा गजर गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिला असून सोना मोहपात्रा यांनी तो स्वरबद्ध केला आहे. प्रकाश बल्लाळ या चित्रपटाचे कला दिग्दर्शक आहेत, तर सागर वंजारी संकलक आहेत. रंगभूषा आणि केशभूषा रसिका रावडे यांनी केली असून, शीतल पावसकर यांनी यांनी कॅास्च्युम डिझाइन केले आहेत. विठ्ठल गोरडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत, तर विनायक पाटील निर्मिती व्यवस्थापक आहेत.

Web Title: Pramyare of the movie 'Ghat' in Rang Deel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.