आधी जीन्स, त्यावर साडी...! प्रार्थना बेहरेच्या ‘या’ हटके फोटोला निमित्त भारी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 01:30 PM2020-03-08T13:30:00+5:302020-03-08T13:36:03+5:30

हा काय प्रकार?

prarthana behare new photoshoot on womens day 2020-ram | आधी जीन्स, त्यावर साडी...! प्रार्थना बेहरेच्या ‘या’ हटके फोटोला निमित्त भारी!!

आधी जीन्स, त्यावर साडी...! प्रार्थना बेहरेच्या ‘या’ हटके फोटोला निमित्त भारी!!

googlenewsNext
ठळक मुद्देप्रार्थना सध्या आपल्याला खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे.

 कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. स्वत:चे हटके फोटो शेअर करून ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिचे ताजे फोटोही असेच हटके आहेत. होय, प्रार्थनाने काही तासांपूर्वी हे फोटो शेअर केलेत आणि फोटो शेअर केल्याबरोबर ती चर्चेत आली. 


निमित्त काय तर जागतिक महिला दिन. होय, जागतिक महिना दिनाच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा देत प्रार्थनाने साडीतील काही खास फोटो शेअर केलेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. होय, कारण या फोटोंमध्ये प्रार्थनाने आधी जीन्स घालून मग त्यावर साडी नेसली आहे आणि यावर तिनं डेनिम जॅकेट घातले आहे.

‘आज थोड़ा लिबास में बदलाव लाया, कल थोड़ा समाज में होगा, पहचान तो है ही मेरी, बस अब रवायत ए आगाज होगा...,’ असे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे.
 प्रार्थना सध्या आपल्याला खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे.

ती तिच्या कुटुंबाला पहिले प्राधान्य देत असून जास्तीत जास्त वेळ हा तिच्या पतीसमवेत घालवत आहे. प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे.

डब्बा एैस पैस, सॉल्ट आणि प्रेम  यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे. प्रार्थनाने याआधी ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. 

Web Title: prarthana behare new photoshoot on womens day 2020-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.