प्रार्थना बेहरेचे मुंबईतील घर आहे खूपच आलिशान, घराच्या बाल्कनीतून दिसतो निळाशार समुद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 12:52 PM2022-02-28T12:52:26+5:302022-02-28T12:53:18+5:30

अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere)ने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओने चाहत्यांचेच नाही तर सेलिब्रेटींचेही लक्ष वेधून घेतले आहे.

Prarthana Behere's house in Mumbai is very luxurious, the balcony of the house overlooks the blue sea | प्रार्थना बेहरेचे मुंबईतील घर आहे खूपच आलिशान, घराच्या बाल्कनीतून दिसतो निळाशार समुद्र

प्रार्थना बेहरेचे मुंबईतील घर आहे खूपच आलिशान, घराच्या बाल्कनीतून दिसतो निळाशार समुद्र

googlenewsNext

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) हिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. प्रार्थना सोशल मीडियावर सक्रिय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र या व्हिडीओत ती नसून तिच्या आलिशान घराच्या बाल्कनीतून सुंदर व्ह्यूची झलक पहायला मिळते आहे.

प्रार्थना बेहरे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. या दोन्ही व्हिडीओत ती बाल्कनीतून बाहेरचा नजारा दाखवताना दिसते आहे. तिच्या बाल्कनीतून समुद्र पाहायला मिळतो आहे. या व्हिडीओत तिने सकाळ आणि संध्याकाळचा व्ह्यू दाखवला आहे आणि त्या दृश्याचा आनंद प्रार्थना बेहरे लुटते आहे. 


प्रार्थना बेहरेने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे. यापूर्वीही देखील तिने तिच्या घराची झलक फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून दाखवली आहे.

प्रार्थनाचे मुंबईतील हे घर खूपच आलिशान आहे. तिने घराची सजावट छान पेटिंग्स आणि वस्तूंनी केली आहे. तसेच खुद्द प्रार्थनाने स्वतः एका भिंतीवर चित्र रेखाटले आहे. त्याचा फोटोदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. तिने घरातील बाल्कनीत छान झाडेदेखील लावली आहेत.

प्रार्थना बेहरे सध्या माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत ती नेहाची भूमिका साकारते आहे. तिच्यासोबत अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहे. 

Web Title: Prarthana Behere's house in Mumbai is very luxurious, the balcony of the house overlooks the blue sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.