नमा तू ही भूमिका जगलीस! 'नाच गं घुमा' पाहिल्यानंतर प्रसाद खांडेकर भावुक, म्हणतो- "हसवत जाणारा सिनेमा कधी डोळ्यात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 04:09 PM2024-05-03T16:09:26+5:302024-05-03T16:09:52+5:30

प्रसाद खांडेकरला नम्रताचं कौतुक, 'नाच गं घुमा' पाहिल्यानंतर शेअर केली खास पोस्ट

prasad khandekar post for nach ga ghuma movie praises namrata sambherao | नमा तू ही भूमिका जगलीस! 'नाच गं घुमा' पाहिल्यानंतर प्रसाद खांडेकर भावुक, म्हणतो- "हसवत जाणारा सिनेमा कधी डोळ्यात..."

नमा तू ही भूमिका जगलीस! 'नाच गं घुमा' पाहिल्यानंतर प्रसाद खांडेकर भावुक, म्हणतो- "हसवत जाणारा सिनेमा कधी डोळ्यात..."

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'नाच गं घुमा' हा सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. परेश मोकाशी दिग्दर्शित या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक होते.  घराघरातील कामवाली बाई म्हणजेच घुमाचं विश्व या सिनेमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आलं. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मुख्य भूमिकेत असलेल्या 'नाच गं घुमा' सिनेमाला प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाचे शो ठिकठिकाणी हाऊसफूल होत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरने 'नाच गं घुमा' सिनेमासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

प्रसादने 'नाच गं घुमा' सिनेमा आणि नम्रता संभेरावचं विषेष कौतुक केलं आहे. ही पोस्ट शेअर करत तो म्हणतो, "नाच गं घुमा...आवर्जून बघा मंडळी आणि आपल्या आयुष्यात असणाऱ्या घुमासाठी हा सिनेमा बघा...खुपच सुंदर सिनेमा .... सगळ्यांच कलाकारांची आणि तंत्रज्ञाची उत्तम कामे ...मुक्ता ताई , सुकन्या ताई , सुप्रिया ताई, सारंग , मायरा सगळ्यांनीच धमाल केलीय ...हलका फुलका हसवत जाणारा सिनेमा कधी आपल्या डोळ्यात पाणी आणतो कळत नाही".

"आणि आमची नमा ...तू आतापर्यंत केलेल्या कामांपैकी मला सर्वात जास्त आवडलेलं काम आहे हे नमा ....काय च्या काय काम केलंयस तू...तू जगलीयस ती भूमिका...Keep it up ..तुला अजून अश्याच उत्तमोत्तम भूमिका मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
स्वप्नील दादा आणि सर्व निर्माते आणि संपूर्ण टीम च पुन्हा एकदा अभिनंदन आणि खुप खुप प्रेम. खुप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला," असंही त्याने पुढे म्हटलं आहे. 

प्रसादच्या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दरम्यान, या सिनेमात मुक्ता बर्वे आणि नम्रताबरोबर सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने, सारंग साठ्ये, बालकलाकार मायरा वायकुळ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

 

Web Title: prasad khandekar post for nach ga ghuma movie praises namrata sambherao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.