तिच्यासाठी कायपण...! प्रसाद ओकनं पत्नीसाठी नाही तर 'ती'च्यासाठी केला रेल्वेचा अख्खा डब्बा बुक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 02:23 PM2023-03-10T14:23:57+5:302023-03-10T14:24:34+5:30
Prasad Oak: आता पुन्हा एकदा प्रसाद ओक एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने पत्नीसाठी नाही तर एका खास व्यक्तीसाठी असं काही केलं, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होते आहे.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील गुणी अभिनेता म्हणजे प्रसाद ओक (Prasad Oak). अभिनय, दिग्दर्शन, लेखन, निर्माता अशा तिन्ही भूमिकेतून त्याने मराठी सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. गेल्या वर्षात प्रसाद ओक सातत्याने चर्चेत राहिला. त्याने अभिनित केलेला धर्मवीर, दिग्दर्शित केलेल्या चंद्रमुखी चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा एकदा प्रसाद ओक एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रसादने पत्नीसाठी नाही तर एका खास व्यक्तीसाठी असं काही केलं, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होते आहे. याबद्दल खुद्द त्याची पत्नी मंजिरी ओक हिने व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे.
मंजिरी ओकने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत तिने लिहिले की, मस्काराला घेउन कुठे तरी ट्रिप करायची होती . पण कुठे ? हया विचारात एक महिना खर्च केला. सगळे ऑप्शन्स ट्राय केले पण आपल्या देशात पेट बरोबरचे प्रवास (स्पेशली एयर ट्रैवेल ) का सोइचे नाहीत ? असो
हा वेगळा विषय आहे..म्हणून मग आम्ही जिकड़े सगळ्यांचे प्लान कॅन्सल होतात तिकडे म्हणजे गोव्याला जायचं ठरवले .पण नुसतं ठरवून काय उपयोग ? जायचं कसं हा प्रश्न होताच पण ते सगळं सूखकर करायला सगळ्यात मदत झाली ती म्हणजे आपल्या कोकण रेल्वेची.
तिने पुढे म्हटले की, काही पेपर्सची फॉर्मॅलिटी पूर्ण करून दादर वरून रात्री कोकण एक्सप्रेसनी आम्ही निघालो. अश्या प्रवासाचा अनुभव न्हवता म्हणून अक्खा कूपे बुक केला आणि मस्कारा ला पुर्णपणे तिच्या मनासारखी ट्रिप एन्जॉय करू दिली . आणि तीनी अक्षरशः जीवाचा गोवा केला आणि तिच्यामुळे आम्ही सुद्धा खूप वर्षानी ट्रेनचा प्रवास एन्जॉय केला. कमाल एक्सपीरियन्स होता. सार्थक ओक दादाला खूप मिस केले. मग पहाटे मडगांवला उतरुन टॅक्सी केली आणि थेट नॉर्थ गोवा गाठलं. तिकडे जायच्या आधीच आम्ही पेटफ्रेंडली हॉटेल बुक केलं होतं. त्यांचाच प्रायव्हेट बीच होता . त्यामुळे मस्काराला मनसोक्त मज्जा करता आली आणि पर्यायानी आम्हाला पण.
मस्काराच्या ट्रेनरनी आम्हाला सांगितल होतं की वर्षातुन चार ट्रिप्स तुम्ही प्लान करत असाल तर त्यातली एक तरी तिच्या बरोबर करा . म्हणून अनेक गोष्टी शिकत शिकत हे सगळं धाडस केलं. अर्थात् बरोबर मयांक ओक दादा होता म्हणून मस्कारा पण शहाण्यासारखी वागत होती. ही माहिती मला शेयर करायला जरा लेट झाला पण आमच्यासाठी हा एक नवीन एक्सपीरियन्स होता म्हणून मला हे शेयर कारायचेच होते, असे मंजिरी ओकने या पोस्टमध्ये म्हटले.
प्रसाद ओक आणि मंजिरीने अशा प्रकारे मस्काराला गोवा फिरवून आणले. त्यांची ही कल्पना नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे आणि ते त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत.