ट्रॅफिकमध्ये अडकताच प्रसाद ओकने पत्नी मंजिरी ओकसोबत केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 12:26 PM2022-03-31T12:26:31+5:302022-03-31T12:31:49+5:30
प्रसादने मंजिरी ओकसोबत एक इन्स्टा रिल केलं आहे. traffic मधला टाइमपास.. 😜 असे कॅप्शन त्याने दिलं आहे. त्यांच्या चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रसाद ओक अभिनयापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रसादने आता दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आतापर्यंत त्याने अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसाद कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा त्याच्या अपकमिंग प्रोजेक्ट आणि कुटुंबाविषयीची माहिती शेअर करत असतो. प्रसाद पत्नीसोबत मिळून अनेक भन्नाट व्हिडीओ इन्स्टावर शेअर करत असतो आणि त्याचे व्हिडीओ चाहत्यांचा पसंतीस देखील उतरतात.
प्रसादने मंजिरी ओकसोबत एक इन्स्टा रिल केलं आहे. traffic मधला टाइमपास.. 😜 असे कॅप्शन त्याने दिलं आहे. प्रसाद आणि मंजिरी कारमध्ये आहेत आणि ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत याचा अंदाज या कॅप्शनवरून येतो. वेळेचा सदुउपयोग करत प्रसाद आणि मंजिरीनं एक भन्नाट रील बनवलं आहे.
किशोर कुमार यांच्या पगली... पगली.. कभी तुमने सोचा....या हिंदी गाण्यावर भन्नाट रील बनवत ट्रॅफिकमधला टाइमपास शोधला आहे. त्यांच्य या रीलवर सेलेब्स चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे. एकानं म्हटलं आहे की, ट्रॉफिकमध्ये पण कमाल क्या बात है सर, वेळेचा सदुपयोग छान करून घेतलात....अशा कमेंट्स त्याच्या चाहत्यांकडून या व्हिडीओ येतायेत.
प्रसाजची पत्नी मंजिरी बिझनेस वूमन असून ती अनेक ब्रँडसोबत कोलॅबोरेशनदेखील करत असते. सध्या मंजिरी कलाविश्वातही नशीब आजमावत आहे. प्रसादसोबत ती असिस्टंट डायरेक्टरचंही काम करते.
दिग्दर्शन, अभिनेता, सुत्रसंचालक अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधून प्रसाद ओक (Prasad Oak) नेहमीच चाहत्यांच्या भेटीसाठी येत असतो. मालिका,टीव्ही शो, सिनेमा असो प्रसादने सर्वच भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.